भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 399, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 399

सार्थ तुकारामगाथा ३६३ ७३६ जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि देवाचा १ पुतळा ॥ १ ॥ आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ २ ॥ नामरूपी जडले २ चित्त । त्याचा दास मी अंकित ॥ ३ ॥ तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नवविध - श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन अशा नऊ प्रकारांनी भक्ती. अर्थ - जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, जिव्हाळ्याने भक्ती करितो, तो प्रत्यक्ष देवाचाच पुतळा आहे, असे समजावे. १ मग तो पंडित आहे की नाही, शहाणा आहे की नाही, हे काही माझ्या मनात येत नाही. २ माझे चित्त त्याच्या नामरूपात जडलेले असते. मी त्याचा अंकित दास बनलेलो असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रवण, कीर्तन, स्मरण इत्यादी नऊ प्रकाराची भक्ती जो जाणतो तोच खरा शुद्ध होय ४ ७३७ याजसाठीं वनान्तर । जातो सांडुनियां घर ॥ १ ॥ माझें दिठावेल प्रेम । बुद्धि होईल निष्काम ॥ २ ॥ अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥ ३ ॥ तुका म्हणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडुनिया - सोडून, दिठावेल - दृष्ट लागेल अर्थ - मी घर सोडून वनात यासाठीच जातो की, १ श्रीहरीच्याबद्दल माझ्या मनात जो प्रेमभाव आहे त्यास दृष्ट लागेल, अशी एकसारखी भीती मला असते या वनवासाने माझी बुद्धीही निष्काम होत राहील. २ अद्वैताचे बोलणे मी माझ्या कानानी कधी ऐकत नाही ३ मीच ब्रह्म आहे, अशा भ्रमास मी माझ्या सगुण प्रेमाच्या आड येऊ देणार नाही ४ विवरण - सगुणभक्तीच्या आवडीचा हा एक लहानसा पण गोड असा अभंग अर्थपूर्ण आहे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अद्वैत हेच खरे, पण त्याची अनुभूती घ्यायची ती द्वैती भूमिकेवरील भक्तीमध्ये लवथून परमार्थ भोगा- साठी अगेव झाला याची अनुभूती भक्तीच्या प्रेमसुखात मोठी असते तुकारामबुवा म्हणत आहेत, माझे हे सगुणाचे प्रेम दृष्ट लागून कमी होईल, म्हणून मी रानावनात जातो तेथे मग माझी बुद्धीही इतर विषयातून कमी कमी होऊन केवळ त्याच्या रूपातच जडेल अद्वैताच्या प्राप्तीचा ध्यास लागला की, मग मीच ब्रह्म अशी भावना होईल तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ही भावना ठीक असली तरी, भक्तिसुखास तिने उणेपणा येतो मीच ब्रह्म आहे अशी धारणा झाली तर मग भक्ती कुणी कुणाची करायची ? म्हणून तुकोबा म्हणतात की, असल्या अहंब्रह्माची बाधा मला होऊ नये ७३८ बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥ १ ॥ नको मानूं भार । पाहो दोषांचे डोंगर ॥ २ ॥ आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥ ३ ॥ तुका म्हणे दोषी । मी तो पातकाची राशी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवरीं - सावरून धर, रक्षण कर अर्थ - देवा, मी या भवसागरात बुडून जात आहे तू त्यातून माझे रक्षण कर १ माझ्या दोषांचे किंवा अपराधांचे डोंगर पाहून त्याचे ओझे तू मानू नकोस २ पतित लोकांना पावन करून घेण्याचे जे तुझे ब्रीद आहे त्याचा तू सांभाळ कर ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर पातकाची रास असून दोषी आहेच, पण तू पतितपावन आहेस ना ? ४ १ देवाचा, २ मीनले