भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 400, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 400

३६४ सार्थ तुकारामगाथा ७३९ अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिले ॥ १ ॥ पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ २ ॥ होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे बोली । पुढें कुटितचि जाली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा – अक्षई-कायम टिकणारी अर्थ - या भक्तिमार्गाची इमारत आम्ही उभी केली आहे, ती कायम टिकणारी आहे आता जी उभी राहिली आहे, ती काही केल्या मोडणार नाही १ चांगला खोल असा तिचा पाया असल्यामुळे तेथे कुणाचे काही चालणार नाही २ आजवर सर्व हिशेब पसरून राहिला होता काही तपास लागत नव्हता, पण आता तपास करता सर्व हिशेब नीट लागला व ताळाही जमून आला ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून या मार्गाविषयीचे पुढील बोलणेही आमचे सपत्यासारखे झाले ४ ७४० तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥ १ ॥ जपतपादि साधने । मज चिंतवेना मनें ॥ २ ॥ करुणावचनें । म्या भाकावीं तुम्हा दीने ॥ ३ ॥ तुका म्हणे घेईं । माझें थोडें फार ठावीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भाकावीं-बोलावीत अर्थ - देवा, तुझे मोठे मोठे भक्त तुझ्याविषयी फार मोठा विचार करतात. १ देवा, त्यांच्यासारखी जपतपादी साधनेही मला माझ्या मनात सुद्धा आणता येत नाहीत २ करुण अशा वाणीने मी दीनाने तुमच्याशी बोलावे, कृपा मागावी, एवढेच मला येते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी जी काही माझी थोडीफार सेवा असेल ती तू घ्यावीस ४ ७४१ लावुनि काहाळा । सुखें करितो सोहळा ॥ १ ॥ सादवीत गेलो जना । भय नाहीं सत्य जाणा ॥ २ ॥ गात नाचत विनोदें । टाळघागऱ्याच्या छंदें ॥ ३ ॥ तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - काहाळा-झांजा, सादवीत-सावध करीत, सागत, भेव-भीती अर्थ - मी झांजा वगैरे वाजवून मोठ्या सुखाने भजनाचा सोहळा करितो १ याच मार्गाने मी लोकांना सावध करीत गेलो आहे सत्यास कधीही भय नाही, असे मी सागत आलो आहे २ मोठ्या तल्लीनतेने मी गातो, नाचतो, टाळघागऱ्याच्या छंदावर माझे कीर्तन सुरू असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मला कसली भीती आहे ? प्रत्यक्ष देव माझ्या पुढेच आहे ना ४ ७४२ मुक्त फासया म्हणावे । बंधन तें नाहीं ठावें ॥ १ ॥ सुखें करितो कीर्तन । भय विसरले मन ॥ २ ॥ देखिजेना नास । घालू कोणावरि कास ॥ ३ ॥ तुका म्हणे साहे । देव आहे तंसा आहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फासया-वधास, साहे-नाह्य, अर्थ :- बंधन म्हणजे काय हेच मला माहीत नसल्याने, मुक्तता किंवा मोक्ष कशास म्हणावे, हेच मला समजत नाही १ मी या ठिकाणी आता सुखाने कीर्तन करीत असून मला कसलीही भीती नाही २ आता कुणाचा नाश

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 400, कुल 611 में से · BharatKosha