सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 401, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३६५ करावा अशी वस्तूच समोर दिसत नसल्यामुळे कास घालून आता कुणाचा प्रतिकार करावा ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा देव मला सदैव साह्य करीत असून तो आहे तसाच कृपाळू आहे. ४ ७४३ ओनाम्याच्या काळें १ । खडे मांडविले २ वाळें ॥ १ ॥ तेंचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ २ ॥ रज्जु सर्प होता । तोंवरीचि न कळतां ॥ ३ ॥ तुका म्हणे साचें । भय नाहीं वागुलाचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा.- ओनाम्याच्या काळें-ओनामा शिकण्याच्या वेळेस, लहानपणी, रज्जु-दोर अर्थ :-लहानपणी ओनामा किंवा श्रीगणेशा शिकत असताना प्रथम एकेक अक्षरावर खडा ठेवून शिकवले जाते. लहान मुलांसाठी ही रीत असते. १ पण मग पुढे चांगला अभ्यास झाल्यावरही खडे मांडून शिकविण्याची काय जरूरी आहे ? २ दोर हा सर्प आहे अशी भावना होती, तोपर्यंतच त्याची भीती होती. ३ तुकाराम महाराज म्हणतात, बागुलाचे भय तो केवळ बागुलबुवा आहे, हे सत्यज्ञान होताच नाहीसे होते. ४ ७४४ आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥ १ ॥ नको बडबडूं भांडे । फोडीं वाउगें तें रांडे ॥ २ ॥ विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥ ३ ॥ तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-आठव-स्मरण, वैखरी-वाणी अर्थ :- माझ्या वाणीने आता यापुढे स्मरण म्हणून त्या विठ्ठलाचेच नाम घ्यावे. १ हे वाचे, उगाच बडबड करून भांडणे उकरू नकोस. २ विठ्ठल विठ्ठल असे शब्द सोडून तू दुसरे काहीही बोलू नकोस. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे जर न करशील तर तुला देवाची शपथ आहे. ४ ७४५ काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥ १ ॥ मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ २ ॥ त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहेँ ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । सत्य घ्यावी आतां सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- शिखा-शेंडी, अंगुष्ट-पायाचा अगठा, त्राहि-रक्षण कर अर्थ:- देवा, तू मनात आणशील तर काय करणार नाहीस ? आता माझी लाज तू राख ना. १ देवा, मी तर अपराधांची रास असून शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत पापांनी भरून गेलो आहे. २ देवा, तू माझे रक्षण करावेस, अशी मी त्रिवार प्रार्थना करीत आहे. मजवर कृपा दृष्टीने पाहा ना. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझी ही सत्य स्वरूपाची सेवा घ्या ना तुम्ही ४ ७४६ वंदीन मी भूतें । आतां अघौंचि समस्तें ॥ १ ॥ तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ २ ॥ गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥ ३ ॥ तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- भूतें-प्राणिमात्र, गाळुनिया -सोडून. १ वेळें, २ माहवले.