सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 402, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३६६ सार्थ तुकारामगाथा अर्थ:- देवा, आता सर्व प्राणिमात्रांना मी नमस्कार करीन. १ नारायणा, पदोपदी मी तुमच्याच भावनेने पाहीन २ लहानमोठा असा भेद सोडून मी वागेन मी याबद्दल वेदास प्रमाण मानीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एवढे झाल्यावर मला दुसऱ्या कुणाची संगत सहन होणार नाही ४ ७४७ पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥ १ ॥ ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ २ ॥ देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥ ३ ॥ गेला अभिमान । लाज वोळविला मान ॥ ४ ॥ शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥ ५ ॥ तुका म्हणे सखे । विठोबाच ते सारिखे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पुज्यमान-पूजा करण्यास योग्य असे. ओतली-निर्माण झाली, बोळविला-नाहीसा केला. अर्थ - पूजा करण्यास योग्य असे जे हे हरिभक्त कथेसाठी उभे आहेत, १ आणि कीर्तनामधून ज्याचे गुणगान ते करीत आहेत, त्याची मूर्तीच त्यांच्यासमोर उभी आहे, निर्माण झाली आहे. २ या हरिभक्तांना स्वतःच्या देहाचा विसर पडला असून त्यांनी केवळ आनंदातच संचार केला आहे. ३ त्यांच्यामधील सर्व अभिमान संपला असून लाज व मान यांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ४ शोक, मोह, चिंता यांचे नाव सुद्धा आता ते जाणीत नाहीत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे विठ्ठलभक्त केवळ विठ्ठलच बनून गेले आहेत. ६ ७४८ भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥ १ ॥ धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ २ ॥ हिरा हिरकणी । काढी आंतुनि अहिरणी ॥ ३ ॥ तुका म्हणे केलें १ । मन २ शुद्ध हें चांगलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - येरयेरां-एकमेकाना, अहिरणी-ऐरण अर्थ :- जैसा भक्तिभाव असेल, तसे फळ आपणांस प्राप्त होईल. इतर बळाचा काही उपयोग देवाच्या प्राप्तीसाठी होणार नाही. १ जो ज्या जातीपाशी असेल, त्या जातीपाशी तो धावून जाईल. कारण परस्परांचे चित्त एकमेकांना समजत असते. २ वरून घाव बसले असताना न फुटता हिरा ऐरणीतच अडकतो; पण हिरकणीने तो बाहेर येतो. ३ त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आपले मन शुद्ध, चांगले व ईश्वरभक्ताच्या जातीस मिळणारे असावे. ४ ७४९ वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥ १ ॥ ऐसे लटके जे ठक । तयां इह ना पर लोक ॥ २ ॥ परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥ ३ ॥ तुका म्हणे हाडें । कुत्र्या लाविलें झगडें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फोस-पोकळ, व्यर्थ, ठक-फसविणारे. अर्थ :- वरवर परमार्थज्ञान सांगणाऱ्याचे बोल चांगले रसाळ वाटतात; पण खऱ्या व शुद्ध ज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास त्याचे अंतरंग पोकळच असते. १ असे हे लोक फसविणारे असतात. त्यांना घड हाही लोक मिळत नाही व परलोकही उरत नाही. २ तो ऐकतो एक व सांगतो दुसरे भलतेच. ३ अंगाला परमार्थविचाराची धूळ धडही लागू देत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हाडकाच्या तुकड्यासाठी भांडणाऱ्या कुत्र्यांसारखी त्यांची स्थिती असते ४ १ भले, २ मन शुद्ध जीही केले.