सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 403, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३६७ ७५० हेचि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥ १ ॥ अवघीं तुझीं पदें । नमस्कारीन अभेदें ॥ २ ॥ न वर्जितादिशा । जाय तेथेंचि सरिता ॥ ३ ॥ नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अभेदें-अभेद समजून, न वर्जित-न सोडता अर्थ :- देवा, आता मी तुझी पूजा अशाच प्रकारे करीन. १ मी अभेदत्व समजून, सर्वत्र तुझेच पावले आहेत, असे समजून नमस्कार करीन. २ कोणत्याही दिशेस न वगळता, न सोडता, सर्वत्र समत्वाच्या भावाने जाऊन पाहीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी गुणदोषाच्या बाबतीत एकदेशी होणार नाही ४ ७५१ आपले तो कांहीं । येथें सांगिजेंसें नाहीं ॥ १ ॥ परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ २ ॥ पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वे निराळा ॥ ३ ॥ तुका म्हणे भुली । इच्छ्या उफराट्या चाली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वायचळ-वाचाळ, बरळ-बडबड, भुली-चुकीने अर्थ - या मानवी जन्मात आपले असे काही आहे, हे सांगता यायचे नाही. १ पण ही माझी वाणी वाचाळ असून व्यर्थ बडबड करण्याचा छंद घेते. २ हा देह म्हणजे पंचमहाभूतांचा एक मेळावा असून आत्मतत्त्वा- पासून तो निराळाच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या वाणीमुळे देह व आत्मा एकच मानण्याची चूक होत असते. ४ ७५२ विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठीं वाचा ॥ १ ॥ कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ २ ॥ न पाहे सिदोरी । जाती¹ कुळ न विचारी ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नावाडा-नावाडी, फुकाचा-फुकटचा. अर्थ - भवसागरातून तरून नेणारा हा विठ्ठल फुकटचा नावाडी आहे. मात्र त्याची आळवणी आपण आपल्या वाणीने सतत केली पाहिजे १ हा देव कमरेवर हात ठेवून जशाचा तसा उभा असून खालीही बसत नाही. २ पारपुण्याची शिदोरी किती आहे किंवा भक्ताची जातकूळी कोणती आहे, याचा विचार न करता हा भक्तावर कृपा करतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, भक्तानी हाक मारल्याबरोबर हा देव त्वरित त्याला भेट देतो. ४ ७५३ कृपावंत किती । दीनैं बहु आवडती ॥ १ ॥ त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ २ ॥ भुलो नेदी वाट । करीं धरुनि दावी नीट ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवे । अनुसरता एका भावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - योगक्षेमचिंता-कल्याणाविषयी सर्व प्रकारची काळजी. अर्थ - हा ईश्वर किती कृपाळू आहे । याला आपले दीन भक्त नेहमी आवडतात. १ तो स्वतः त्यांचा सर्व भार शिरावर घेऊन त्याची सर्व कल्याणदायक चिंता तोच वाहतो. २ तो कधी सन्मार्ग चुकू देत नाही हात धरून नीट वाट दाखवितो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याला एकनिष्ठेने आपण शरण जावे. ४ १ याती.