सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 404, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३६८ सार्थ तुकारामगाथा
७५४ नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकां वांचुनी ॥ १ ॥ रूप आवडे आम्हांसी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ २ ॥ आम्हीं भावें बळिवंत । तुज घालूं हृदयांत ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा – जोडी-प्राप्ती, धाक-भीती. अर्थ - या ईश्वरास आम्ही भाविक भक्त जितके ओळखतो, तितके कोणीही, वेदश्रुतीसुद्धा याला जाणीत नाहीत. १ याचे रूप आम्हास फार आवडते. त्याप्रमाणे आम्ही याची प्राप्ती करून घेतली आहे २ आम्ही भक्ति- भावामुळे बलवान झालो असून त्यायोगे देवा, तुला आमच्या हृदयात घालून ठेवू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमची तुला मोठीच भीती असल्याने हाक देताच तू आम्हास पावतोस. ४
७५५ मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥ १ ॥ मागें परतावी१ तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ २ ॥ येउनिषां घाली घाला । नेणों काय होई२ तुला ॥ ३ ॥ तुका म्हणे येणें । बहु नाडिले शाहाणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा – लुलया-विषयात, नाडिले-फसविले. अर्थ - मन या विषयाच्या ठिकाणी गुंतून राहिले आहे ते पुन पुन त्याच ठिकाणी जात आहे १ त्या मनास तेथून मागें फिरवील तोच या पृथ्वीवर मोठा शूर समजावा लागेल. २ हे मन जेव्हा घाला घालील तेव्हा काय होईल ते समजणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या अवखळ मनाने पुष्कळ शहाण्याना फसविले आहे. ४
७५६ घेईं३ माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥ १ ॥ तुम्हीं घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ २ ॥ तुम्हीं ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ ३ ॥ मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥ ४ ॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - तेथे-विठ्ठलचरणी. अर्थ:- माझ्या वाचे, तू या विठोबाचे गोड नाम सतत घेत जा १ डोळ्यानो, तुम्ही पोट भरून असे याच विठोबाचे मुख पाहून सुखी व्हा. २ कानानो, या माझ्या विठोबाचेच गुण तुम्ही सदैव ऐका ३ माझ्या मना, त या विठ्ठलाच्या चरणीच धाव घेऊन तेथेच स्थिर राहा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, जीवा, आता या विठ्ठलास तू कधी सोडू नकोस ५
७५७ धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टीं न्याहाळितां ॥ १ ॥ बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ २ ॥ सर्वमंगळाचें सार । मूळ सिद्धींचें भांडार ॥ ३ ॥ तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपाः- धणी-तृप्ती, बरवा-चांगला, सुरंग-सुंदर, अतपार-सीमा, लेखा-समजा.
१ परतवी, २ होईल, ३ घेई घेई