भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 411, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 411

सार्थ तुकारामगाथा ३७५ तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥ ३ ॥ तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गळित व्हावे-संपावा, व्यापार-व्यवहार. अर्थ :- आपला सर्व अभिमान संपावा. याच स्थितीचे नाव योग व तप असे आहे. १ जे काही तुम्हांस, करावचे असेल ते हेच करा, की सत्याला धरून सर्व व्यवहार असावा. २ तरच तुमची जन्ममृत्यूची येजा संपेल व देहबुद्धीचा भार कमी होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मानापमानाचेही ओझे आपणावर कधी घेऊ नये. ४ ७८० करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥ १ ॥ तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं १ ॥ २ ॥ मजुराचें धन । विळा दोरचि जतन ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वारी-व्यर्थ घालवितो, आदा-जमा, वेंचा-खर्च. अर्थ :- हा स्नानसंध्या वेळच्या वेळी करतो, पण दुसऱ्याचे अन्न खाऊन सारे व्यर्थ घालवितो. १ त्याला मग कसलाच लाभ किंवा तोटा होत नाही. त्याच्या जमेचा व खर्चाचा हिशेब सारखाच राहतो. २ मजुराचे शेवटी धन कोणते? तर त्याने आपल्या विळ्याचे किंवा दोराचे जतन केले असते तेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अधीर होणाऱ्या माणसांस देव कसा भेटणार ? ४ ७८१ वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेनें हालें ॥ १ ॥ नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ २ ॥ अंगुलिया मोडी । त्यासी काय सिलें घोडीं ॥ ३ ॥ नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाखर-वस्तरा, अंगुलिया-बोटाच्या दावाने, सिलें-हत्यार, शस्त्र, जेठी-पहिलवान. अर्थ :- कोणी एक मनुष्य हातातील वस्तारा घेऊनच धावून आला, तर त्यास तरवार घेऊन मारण्यास जाण्याची काय जरूरी आहे ? १ 'हे काही ठीक नव्हे' असे म्हणूनही त्याला फजित करता येते. २ नुसत्या बोटांच्या दाबानेच ज्याचा मोड होईल त्याच्यासाठी हत्यारांची किंवा घोडेस्वारांची काय जरूरी आहे ? ३ नपुंसकाच्या, नामर्दाच्या पराभवासाठी पहिलवानाची काय जरूरी आहे ? ४ ७८२ वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥ १ ॥ तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगेंचि ब्रह्म व्हावें ॥ २ ॥ जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दांचें पांडित्य ॥ ३ ॥ गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥ ४ ॥ जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पूजामंत्र ॥ ५ ॥ साधनाच्या ओढी । डोलियांच्या मोडामोडी ॥ ६ ॥ तुका म्हणे देहीं । संत जाहाले विदेही ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- वर्णाश्रम-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व सन्यासी हे चार आश्रम. अर्थ :-धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तू वर्णाधर्मांचे धर्म पाळशील तर तू उत्तम लोकांस पावशील एवढेच. १ पण स्वतःच्या देहानेच ब्रह्मपदाचा अनुभव कसा घ्याया हे मात्र तुला समजणार नाही. २ तू जरी मोठा पंडित १ मनीं