भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 410, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 410

३७४ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- लोह-लोखंड, चुंबकाच्या--लोखंडास ओढून घेणाऱ्या धातूच्या, मोहरा-दोऱ्यास अग्नीच्या मुखातून वाचविणारा दगड, अधील्पणें-पूर्वीच्या गुणांना. अर्थ :- लोखंडास वेधून घेणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या गुणामुळे ते लोखंड निराळेच उभे राहिलेले दिसते. १ तसा देवा, तू आमच्या ठिकाणी निरंतर असून अंतर्बाह्य खेळत राहतोस. २ खरे म्हणजे दोरा हे अग्नीचे भक्ष्य होय. पण तोच मोहरा नावाच्या दगडाबरोबर दोरा अग्नीत टाकला तर मग काही जळून जात नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आधी असलेल्या लाकडांच्या गुणांना चंदनाच्या सहवासाने नाहीसे व्हावे लागते ४ ७७६ डोई वाढवूनि केश । भूतें आणिली अंगास ॥ १ ॥ तरी ते नव्हती संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ २ ॥ मेळवूनि नरनारी । शकुन सांगती नानापरी ॥ ३ ॥ तुका म्हणे मंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- मंद-कपटी, ढोंगी. अर्थ :- डोक्यावर मोठमोठे केस वाढवून अंगात भूत आल्यासारखा संचार करतात. १ पण अशी माणसे काही संत सज्जन नव्हेत. कारण त्यांच्याजवळ स्वसुखाची आत्मखूण नसते. २ भोवती अनेक स्त्रीपुरुष जमवून नाना प्रकारचे शकुन सांगणारेही पुष्कळ असतात. ३ परंतु तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व माणसे ढोंगी असतात. त्यांच्याजवळ परमेश्वर कधीही नसतो ४ ७७७ गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥ १ ॥ चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ २ ॥ सोंगसंपादणी । तरि करूं शुद्ध वाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- बांडा-काळया-पाढऱ्या रंगाचा, सुना-कुत्रा, खळ-दुष्ट अर्थ :- मनास मानेल तसे इंद्रियाधीन होणाऱ्या गाढवास आम्ही सुजाण अशा घोड्याप्रमाणे नीट रूप देऊ. त्याला सन्मार्ग दाखवू. १ काळया-पांढऱ्या रंगांच्या कुत्र्याप्रमाणे वाहणा चघळणारासही आम्ही नीट करू. २ कुणी खोटांच सोंगसंपादनी करीत असले तरी त्यांनाही आम्ही शुद्ध करू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष दुष्ट स्वभावाचा मनुष्य असला तरी त्याला प्रसंगी आम्ही निर्मळ करू ४. ७७८ बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥ १ ॥ विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥ २ ॥ पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥ ३ ॥ माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- बाईल-बायको, काज-काम अर्थ :- देवा, बायको मरण पावली. बरे झाले. मुक्त होऊन गेली. देवाने मला मायेतून सोडविले. १ आता विठ्ठला, तुझे व माझेच असे राज्य असून यात दुसऱ्याचे काही काम नाही. २ पोरगे मरून गेले, तरी ठीक झाले. देवाने याही पाशातून मुक्त केले. ३ माझी आई पाहता पाहता मरून गेली; तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले, ही पण चिंता माझी दूर झाली. ४ ७७९ योग तप याचि नांवें । गळित व्हावें अभिमानें ॥ १ ॥ करणें तें हेंचि करा । सत्यें खरा व्यापार ॥ २ ॥