भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 409, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 409

सार्थ तुकारामगाथा ३७३ ७७२ काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥ १ ॥ सर्वसाधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ २ ॥ योगयागतपें । केलीं तयानें अमूपें ॥ ३ ॥ तुका म्हणे जपा । मंत्र तीनअक्षरी सोपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अमूपें-अमाप, कित्येक, तीन अक्षरी-तीन अक्षरांचा. अर्थ :- या एका विठ्ठलाचे चिंतन केल्यानंतर काय हस्तगत होत नाही ? १ या विठ्ठलाच्या नामात सर्व साधनाचे सार असून याच्याचमुळे भवसागर तरून जाण्यात मदत होते. २ योगयाग, तपश्चर्या इत्यादी अनेक साधने या नामातच आलेली असतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून विठ्ठल हा तीन अक्षरांचा सोपा मंत्र जपा ना. ४ ७७३ हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥ १ ॥ त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ २ ॥ नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥ ३ ॥ करी' अनाचार । वाचे हरिनामोच्चार ॥ ४ ॥ हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥ ५ ॥ म्हणवी हरिचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- अंकित-स्वाधीन झालेला, शुचि-शुद्ध, पवित्र. अर्थ :- वाणीने जो विठ्ठलाचे नाम उच्चारीत आहे तो दुराचारी असला तरी काय झाले ? १ मी त्याचाही दास, स्वाधीन असलेला होईन. काया, वाचा, मनासहित त्याची मी सेवा करीन. २ त्याच्या चित्तात जरी भाव नसला तरी तो हरीचे गुणगान करीत असला म्हणजे झाले ३ तो अनाचार करीत असला व त्याच्या मुखात श्रीहरीच्या नामाचा उच्चार असला तरी दोष पुष्कळच कमी होतो ४ त्याचे कोणतेही भय कुळ असो. ते पवित्र असो की अपवित्र चांडाळाचे असो. ५ तो जर श्रीहरीचा दास असे स्वतःस म्हणून घेत असेल, तर तो खरोखरच धन्य होय, असे तुकाराम महाराज म्हणतात. ६ ७७४ हाकेसरिसी उडी । घालुनियां स्तंभ फोडी ॥ १ ॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ २ ॥ करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥ ३ ॥ तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- स्तंभ-खांब, प्रल्हादाच्या रक्षणार्थ धावून येणाऱ्या नृसिंहाचा संदर्भ आहे. कव-मिठी अर्थ :- हा विठ्ठल किती कनवाळू आहे ? नुसती आर्त मायाने हाक मारताच तो खांब फोडून बाहेर येऊन भक्ताच्या रक्षणार्थ उडी घेतो. १ अशी कृपावंत माउली माझ्या विठाईवाचून दुसरी कोण असणार ? २ त्याची नुसती आठवण करताच हा धावून येतो व आपल्या भक्तांना मिठी घालतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याचे गीत गातानाच सायुज्यता नावाची मुक्ती मिळाल्याचे श्रेय प्राप्त होते. ४ ७७५ लोह चुंबकाच्या बळें । उभे राहिलें निराळें ॥ १ ॥ तंसा तूं चि आम्हांठायीं । पेळतोसी अंतर्वाहीँ ॥ २ ॥ मक्ष अनीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥ ३ ॥ तुका म्हणे अघोलपणे । नेली लांकडें चंदनें ॥ ४ ॥ फ.रो.