भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 408, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 408

३७२ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - नागवण-फसवणूक, ठाव-विसावा अर्थ - देवा, आता हे आयुष्य असेच काहीही न साधता वाया जाणार ना ? फार मोठी फसवणूक या आयुष्यात झाली १ देवा, आता तू रक्षणासाठी धाव ना आता वाट तरी कसली व कुणाची पाहतोस ? २ तुझे व माझे याच गतीने दिवस मात्र वाया चालले आहेत, व अखेर तोंडात माती पडण्याचा प्रसंग आला आहे ३ हे ओढाळ मन एका क्षणाचाही विसावा घेऊ देत नाही भवसागरात बुडवायला तत्पर झाले आहे ४ नाना विषयाचा घाला आता मजवर पडत असून या सर्वानी मला चांगलेच फसविले आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता धाव तू मी तुला मनोभावे शरण आलो आहे ६ ७६९ सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥ १ ॥ त्याचा हाचि उपकार । अतों आम्हाशीं वेव्हार ॥ २ ॥ नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणतें देव ॥ ३ ॥ तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जोडी-प्राप्ती ठाव-स्थान अर्थ - देवा, आजपर्यंत आम्ही अनेक हालअपेष्टा भोगल्या व तुला तुझ्या स्थानाची प्राप्ती करून दिली १ त्याचा तू असाच उपकार फेडणार वाटते ? अंतकाळी आम्हास सोडून जाण्याचा व्यवहार तुला शोभतो काय ? २ तुला नामरूपाचे स्थान आम्हीच प्राप्त करून दिले ना ? नाही तर तुला देव तरी कुणी म्हटले असते रे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा, तुला तुझ्या घरात नीट स्थान प्राप्त करून दिले ते आम्हीच ना ? ४ ७७० आपुले मागता । काय नाहीं आम्हा सत्ता ॥ १ ॥ परि या लौकिकाकारणे । उरी ठेविले बोलणें ॥ २ ॥ येचि आता घडी । करु बैसो तेची फडी ॥ ३ ॥ तुका म्हणे करितो तुला । ठाव नाहींसे विठ्ठला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उरीं-शिल्लक, फडी-निकाल अर्थ - देवा, आमचीच वस्तू मागायला आम्हास अधिकार नाही असे झाले की काय ? १ देवा, आम्ही हे बोलणे चांगले मोठयानेही केले असते पण तुझा नावलोकिक मोठा, म्हणून आम्ही मोठयाने बोलणे शिल्लक ठेविले आहे २ पण आता याच वेळेस ये पाहू थोडा वेळ बसू व आपल्या व्यवहाराचा निकाल लावून टाकू ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमचा या जगात ठावठिकाणा लागणार नाही असे करू का ? ४ ७७१ असो आता किती । तुज यावे काकुलती ॥ १ ॥ माझें प्रारब्ध हे गाढें । तू बापुडें तयापुढें ॥ २ ॥ सोडवीन आता । बीदें तुझीं पंढरीनाथा ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी । तो गाढपाचे कान पिळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गाढपाचे-निर्बळाचे, गरिबाचे अर्थ - असो देवा, आता मी काकुळतीस तरी किती यावे रे ? १ माझे हे प्रारब्धकर्म फार मोठे असून तू त्याच्या पुढे अगदीच क्षुल्लक दिसत आहेस २ पंढरीनाथा, पतितपावन वगैरे जी बीदे तुझी आहेत, ती मी आता दूर करून टाकतो कारण त्याचा उपयोग दिसत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, बलवान माणसाने, निर्बळाचा, गरिबाचा कान धरावा असा नियमच आहे की ४