सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 420, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३८२ सार्थ तुकारामगाथा ७९७ हरिहर सांडुनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥ १ ॥ ऐका त्याची विटंबणा । देवपणा भक्ताची ॥ २ ॥ अंगीं कवडे घाली गळा । परडी कळाहीन हातीं ॥ ३ ॥ गळा गाठा हिंडे दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ ४ ॥ माया सेंदुर दात खाती । जंगट हातीं सटवीचे ॥ ५ ॥ पूजिती विकट दोंद । पशु सोंड गजाची ॥ ६ ॥ ऐसा छंदें चुकली वाटा । भाव खोटा भजन ॥ ७ ॥ तुका म्हणे विष्णुशिवा । वाचुनि देवा भजती ते ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडुनि-सोडून, गाठा-खंडोबाच्या भक्ताच्या गळ्यातील रुप्याची हासळी, जंगट- वाद्य किंवा थाळी दोंद-डेरपोट अर्थ - हे शक्तोचे वा देवीचे उपासक हरि व हर हे मुख्य देव सोडून इतरच क्षुल्लक देवांना भजतात १ पण अशा भक्तांची कशी विटंबना होते ती ऐका व त्याच्या देवाचीही फजिती नीट ऐका २ हे भक्त गळ्यात कवड्याची माळ घालतात, हातामध्ये भिक्षेसाठी परडी घेतलेली असल्यामुळे हे कळाहीन दिसतात ३ याच्या गळ्यात रुप्याची हासळी असते व हे दारोदारी हिंडतात हे लोक मनुष्य असून कुत्रीच वाटतात ४ याचे देव कसे असतात ? तर त्याच्या माथ्यावर शेंदूर फासलेला असतो ते क्रोधाने कराकरा दात खात असतात आणि त्याच्या हातात सटवीचे जंगट वाद्य असते ५ ज्या देवाचे पोट मोठे व ज्यास हत्तीची सोड आहे त्याची हे लोक वरवर पूजा करतात ६ अशा विविध प्रकारच्या खोट्या मार्गांनी याची खरी वाट चुकलेली असते यांचे भजन व याचा भाव याही बाबी खोट्याच असतात ७ तुकाराम महाराज म्हणतात, कारण हे लोक शिवाला किंवा विष्णूला सोडून इतर क्षुल्लक देवांनाच भजतात ८ ७९८ कायासाठीं जाले ज्ञान । तेणे जन नाडिले ॥ १ ॥ काम क्रोध बुचबुची । भुके पुची व्यालींची ॥ २ ॥ पूजेलागीं द्रव्य मागे । काय सांगे शिष्याते ॥ ३ ॥ तुका म्हणे कंचे ब्रह्म । अवघा भ्रम विषयाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नाडिले-फसविले अर्थ - शरीराची उपासना करणाऱ्यांना कसले आले आहे ज्ञान ? स्वत कांदे खातात व मग ब्रह्मज्ञानाचा खोटा आविर्भाव आणून लोकांना फसविततात १ याच्या अंगी कामक्रोध भरपूर भरलेले असून व्यालेल्या कुत्रीप्रमाणे ते ज्ञानाची व्यर्थ बडबड करतात २ हे लोक पूजेसाठी लोकाजवळ द्रव्य मागतात व काही तरी भेदावादाचा उपदेश करतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्याजवळ कसले आले आहे ब्रह्मज्ञान? येथे विषयाचाच सर्व भ्रम आहे ४ ७९९ सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥ १ ॥ बहु लाज वाटे चित्ता । आणिकातें देव म्हणता ॥ २ ॥ सांडूनिया हिरा । कोणे वेचाव्या त्या गारा ॥ ३ ॥ तुका म्हणे हरिहर । ऐसी सांडूनिया धुर ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आणिकातें-इतरांना, धुर-श्रेष्ठ