सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 419, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३८१ शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दोम दोम-भिक्षेच्या वेळी फकीर लोक करतात तो उच्चार, गदा-भीक. अर्थ :- अशा रीतीने या कलियुगात सर्व धर्माचे वाटोळे झालेले असते ते या शाक्ताच्या अनाचारामुळे. १ रामनामासारखा सोपा उपाय सोडून ब्राह्मण लोकसुद्धा फकीराप्रमाणे 'दोम दोम' म्हणत फिरायला लागले आहेत. २ ज्या वस्त्रांना शिवूसुद्धा नये अशी काळी वस्त्रे पांघरून हे शाक्त फिरतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक आपापली उच्च रीत सोडून भीक मागण्यालाच हिंडतात. ४ ७९४ अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥ १ ॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ २ ॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥ ३ ॥ करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणी ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अवघ्या-सर्व, एक-देवीचा उपासक. अर्थ:- हा अनाचाराने वागणारा देवीचा उपासक म्हणजे जगातील सर्व पापांचाच 'घडविलेला आहे असे वाटते. १ पांडुरंगा, माझ्या शरीरास त्याचा विटाळसुद्धा नको. २ कारण त्याच्या अंगी काम व क्रोध पूर्णपणे भरले असून मद्याच्या किंवा दारूच्या नादात तो रंगून गेलेला असतो. ३ कोणतेही पाप करताना याला कधीही शंका वाटत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ७९५ वारितां बळें धरितां हातों । जुलुमें जाती नरकामधीं । १ ॥ रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ २ ॥ जन्म केला वाताहात । थोर घात येथार्थी ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूपीती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धारितां-निवारण करीत असताना. अर्थ - या देवीच्या अनाचारी उपासकास बळाने हाती धरून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी पुनः ते नरकात जाण्याचा प्रयत्न करतातच. १ रांडेच्या या दासास कसलाही उपदेश केला तरी तो रुचत नाही, त्याच्या मनास या एका पापी मार्गाशिवाय दुसरे काही पटतच नाही. २ माणसाच्या जन्मास येऊन याचा घातच झाला. फार मोठा अपाय याच्यामुळे घडत राहतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, तुझ्या कथेलासुद्धा हे नीच लोक दूषणे देतात, नावे ठेवतात. ४ ७९६ शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय विदीची ॥ १ ॥ तिची त्या पडली १ सवे । मागें धांवे म्हणोनि ॥ २ ॥ शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय बेसदारा ॥ ३ ॥ तुका म्हणे शिवळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शूकरी-डुकरीण, विदीची-रस्त्यावरील. अर्थ :- वाम मार्गाने देवीची उपासना करणाऱ्या या शाक्तांची आई म्हणजे रस्त्यावरील विष्ठा खाणारी डुकरीणच समजावी. १ तिला त्याच घाण वस्तूची सवय असल्यामुळे तिच्याच मागे मागे ती असते २ गावच्या वेशीपर्यंत भुंकत, ओरडत जाणारी गाढवी म्हणजे या शाक्ताची आई असेच मानावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक फार वाईट चालीचे आहेत. त्याचे वाणीने वर्णन केले तरी वाणी विटाळून जाईल इतके ते नीच आहेत. ४ १ लागली.