भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 418, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 418

३८० सार्थ तुकारामगाथा तुकारामबुवांच्या वेळी अशा प्रकारच्या हीन आचारधर्माचे व विकृत भावनांचे धर्माच्या नावावर बरेच पंथ पसरले होते शाक्तांचा वामाचारा पंथ हा त्यातलाच एक असल्याने बुवांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला केलेला आहे. शाक्त हे खरे म्हणजे शक्तीचे उपासक, शक्ती हे शिवाचेच एक अंग; ही आदिमाता. तुकोबाही विठ्ठलाला माउली म्हणतात. त्यांचेही उपास्य दैवत पांडुरंगाबरोबर शिवही होतेच. वारकरी एकादशीप्रमाणे सोमवारचेही व्रत करतात म्हणजे शंकराची किंवा शक्तीची अथवा मातृत्वाची उपासना त्यांना मान्य आहे पण या भक्तीच्या नावावर कुणी भ्रष्ट व अनीतीचे आचारविचार प्रस्थापित करू लागला व सामान्य जनास याच मार्गाचा त्यांतील मुक्त व स्वैर प्रचारामुळे लोभ वाढत राहिला तर एकंदर समाजच भलत्या थराला जाईल. हे ओळखून तुकारामबुवा शाक्तांच्या- वर फार झणक शब्दात टीका करीत आहेत ७९१ शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥ १ ॥ सुकृताचा उदो के.१। गोंधळ घाला इंद्रियें ॥ २ ॥ क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥ ३ ॥ मद्यभक्षण मागीणजाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥ ४ ॥ स्तुवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढोसी ॥ ५ ॥ तुका म्हणे भगवती । नेईल अंतीं आपणापें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुकृताचा-पुण्याचा, उदो केला-नाश केला, भगवती-देवी. अर्थ :- देवीची वाममार्गाने उपासना करणारा हा शाक्त गधडा ज्याच्या देशात जाईल तेथे तेथे पापाच्या राशी उभ्या राहतील. १ त्याने आपल्या पुण्याचा नाश केलेला असून केवळ इंद्रियवृत्तींवरच त्याचा भर असतो. विषयाचाच फक्त गोंधळ त्याचा असतो. २ प्रत्यक्ष क्रोधाच्या रूपाने कामवासनाच तेथे असते व तीस देवी कल्पून ते तिची पूजा वगैरे करतात ३ मागीण जातीच्या मुलीस देवी समजून मद्याचे सेवन तिला करवितात व मग आपण ते घेतात. याचे चित्त अशा प्रकारे विटाळानेच वरवटलेले असते. ४ या रांडेची पूजा करून ते स्तवनही करतात. अशा या भांडखोर व ढोंगी लोकांच्या नादी लागू नये. ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा रीतीने ही भगवती देवी शेवटी आपणास स्वतः जवळ घेईल असे यांना व्यर्थ वाटत असते. ६ ७९२ राजा प्रजा ढाड देश । शाक्त वास करिती तो ॥ १ ॥ अधर्माचें उघड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ २ ॥ न पिके भूमि कापे भारें । मेघ वारें पीतील ॥ ३ ॥ तुका म्हणे अवघीं दुःखें । येतीं सुखें वस्तीसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ढाड-वाईट, रंक-दरिद्री अर्थ :- देवीची अशी अनाचारांनी पूजा करणारे शाक्त ज्या देशात निवास करतात तो देश, तेथील राजा, तेथील प्रजा, या सर्वच गोष्टी वाईट असतात. १ त्या ठिकाणी अधर्माचेच पीक उघड उघड आलेले असते. या गावी प्रत्यक्ष धर्मही दरिद्री होऊन वावरत असतो २ या देशात पाऊस पडत नसल्यामुळे भूमी पिकत नाही. पापाच्या ओझ्याने पृथ्वी थरथरा कापायाला लागलेली असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या शाक्तांच्या वास्तव्यामुळे जगातील सर्व दुःखे मोठ्या सुखाने या गावात वस्ती करण्यासाठी येतील. ४ ७९३ ऐसें१ कलियुगाच्या मुळें । जाले धर्माचें वाटोळें ॥ १ ॥ सांडुनियां रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम ॥ २ ॥ १ ऐसा.