सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 417, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३८१ शिवो नये तीं निळीं । वस्त्रे पांघरती काळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दोम दोम-भिक्षेच्या वेळी फकीर लोक करतात तो उच्चार, गदा-भीक. अर्थ - अशा रीतीने या कलियुगात सर्व धर्माचे चाटोळे झालेले असते ते या शाक्ताच्या अनाचारामुळे. १ रामनामासारखा सोपा उपाय सोडून ब्राह्मण लोकसुद्धा फकीराप्रमाणे 'दोम दोम' म्हणत फिरायला लागले आहेत. २ ज्या वस्त्रांना शिवूसुद्धा नये अशी काळी वस्त्रे पांघरून हे शाक्त फिरतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक आपापली उच्च रीत सोडून भीक मागायलाच हिंडतात. ४ ७९४ अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥ १ ॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ २ ॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥ ३ ॥ करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणे ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अवघ्या-सर्व, एक-देवीचा उपासक. अर्थ:- हा अनाचाराने वागणारा देवीचा उपासक म्हणजे जगातील सर्व पापाचाच 'घडविलेला आहे असे वाटते १ पांडुरंगा, माझ्या शरीरास त्याचा विटाळसुद्धा नको २ कारण त्याच्या अंगी काम व क्रोध पूर्णपणे भरले असून मद्याच्या किंवा शाक्तच्या नादात तो रंगून गेलेला असतो. ३ कोणतेही पाप करताना याला कधीही शंका वाटत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ७९५ वारितां बळें धरिता हातां । जुलुमें जाती नरकामयीं । १ ॥ रंडीदासाप्रति काहीं । उपदेश तो ही चालेना ॥ २ ॥ जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारिता-निवारण करीत असताना अर्थ - या देवीच्या अनाचारी उपासकास बळाने हाती धरून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी पुन. ते नरकात जाण्याचा प्रयत्न करतातच. १ रांडेच्या या दासास कसलाही उपदेश केला तरी तो रुचत नाही, त्याच्या मनास या एका पापी मार्गाशिवाय दुसरे काही पटतच नाही. २ माणसाच्या जन्मास येऊन याचा घातच झाला. फार मोठा अपाय याच्यामुळे घडत राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, तुझ्या कथेलासुद्धा हे नीच लोक दूषणे देतात, नावे ठेवतात. ४ ७९६ शाक्तांची शुकरी माय । विष्ठा खाय विदीची ॥ १ ॥ तिची त्या पडली' सवे । मागें धांवे म्हणोनि ॥ २ ॥ शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय बेसदारा ॥ ३ ॥ तुका म्हणे द्विदळोचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शुकरी-डुकरीण, विदीची-रस्त्यावरील अर्थ :- वाम मार्गाने देवीची उपासना करणाऱ्या या शाक्तांची आई म्हणजे रस्त्यावरील विष्ठा खाणारी डुकरीणच समजावी १ तिला त्याच घाण वस्तूची सवय असल्यामुळे तिच्याच मागे मागे ती असते २ गावच्या वेशीपर्यंत भुंकत, ओरडत जाणारी गाढवी म्हणजेच या शाक्ताची आई असेच मानावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक फार वाईट खालीचे आहेत त्याचे वाचेने वर्णन केले तरी वाणी विटाळून जाईल इतके ते नीच आहेत. ४ १ लागली.