सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 432, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३९४ सार्थ तुकारामगाथा अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें खऱ्याचा विकरा । न सरती येरा खोट्या परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नीत-नीतीचा विचार, विकरा-विक्री अर्थ - वाट चुकलेल्या जगास काही नीतिविचार सागावा, हेच आम्हास कौतुकाचे आहे जे कोणी वागायला चुकतील, त्यांची फजिती करावी हेच आम्ही पाहतो १ त्या एका देवाचा निरोप नीटपणे लोकांना सांगितला तर त्यात कसली बाधा आहे ? यासाठी लोक कितीही रागावले तरी काय होणार आहे ? २ या आमच्या भक्तिमार्गात रामनामाचे बाण सुटत असल्यामुळे येथे अविद्येस थाराच मिळत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, येथे खरा- खुरा उपदेश असेल त्याचीच विक्री होत असून खोट्या प्रकारचे येथे काही चालत नाही ४ ८३५ दर्पणासी १नकटें लाजे । शुद्ध बिंब देखोनि ॥ १ ॥ ऐसे अवगुणाच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ २ ॥ अधळयास काय हिरा । गाराचि तो सारिखा ॥ ३ ॥ तुका म्हणे भुके सुने । ठाया नेणे ठाव तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दर्पणासी-आरशाला नकटें-नकटा नावाचा, सुदें-चांगले, सुनें-कुत्रे अर्थ - समोर आरशात तोंड पाहून नकटा मनुष्य लाजतो व चांगला आरसा असला तरी तो त्या आरशावरच चिडतो १ याप्रमाणे जो अवगुणाच्या बाधेने पीडलेला आहे, त्याला जे जे चांगले आहे, ते ते सर्व विपरीतच दिसते २ आंधळ्याला हिरा दाखवून काय उपयोग ? तो त्याला गारेप्रमाणेच वाटणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे उचित, अनुचित न पाहता कुत्रे नुसते भुकतच राहते ४ ८३६ नायडे तरि का येतील हे भाड । घेउनिया तोंड काळें येथें ॥ १ ॥ नासोनिया जाय रस यासगती । खळाचे पंगती नारायणा ॥ २ ॥ तोंडावाटा नर्क काढी अमगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनैं ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं सताची मर्यादा । निंदे तोचि निंदा मायझावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भाड-भांडखोर लोक, खळाचे-दुष्टाच अर्थ - या भांडखोर माणसाना आमचा भक्तिमार्ग जर पसंत नाही, तर मग पुन पुन काळे तोड दाख- विण्यासाठी हे आमच्याकडे येतात तरी कशाला ? १ नारायणा, या दुष्ट लोकांच्या संगतीने व पंगतीने आमच्या प्रभुत्रेमाचा सर्व रंग बिघडून जातो ना ? २ हे दुष्ट लोक आपल्या मुखातून अमगल अशी वाईट वचने काढतात व कुत्र्याप्रमाणे चांगल्या अन्नाला शिवून विटाळ पसरवितात ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला सताची मर्यादा राखता येत नाही, मान ठेवता येत नाही, जो त्याची निंदा करतो, तो अति दुष्ट समजावा ४ ८३७ लेकरा आइति पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥ १ ॥ त्यापरि आमचा जालासे साभाळ । देखिलाचि काळ नाहीं आड ॥ २ ॥ भुकेचे सनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥ ३ ॥ आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आइतें-आयत अर्थ - पित्याने जन्मभर जे जे साठविलेले असते, ते आयतेच उभे करून तो मुलासमोर ठेवतो सर्व सपत्ती त्याने जो मिळवलेली असते, ती तो त्याच्या स्वाधीन करतो १ त्याचप्रमाणे या देवाने आमचा साभाळ केलेला असल्याने, आम्ही काळाला कधी पाहिलेच नाही २ भूक लागली की, प्रेमाचे स्तनपान द्यायला आई जवळच उभी १ नकटें