भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 447, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 447

सार्थ तुकारामगाथा ४०९ शब्दार्थ व टीपा :- गांठी-भांभाळावे, चिंतामणी-चिंतितलेले देणारे रत्न, निकी-चांगली. अर्थ :- सर्वत्र, सर्वकाळ प्रकाशमान असणारा दिया कधी कधी अंधाराला पाहात नाही. हाच भाव मनात धारण करून तुम्ही ईश्वरास जवळ करा. १ नारायण, नारायण हे धन तुम्ही चांगले जतन करून सांभाळावे. २ चिंतामणी जवळ असल्यावर खरे पाहता मग कसलीही चिंता उरू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, उभय लोकी याच ईश्वरप्रेमाच्या रूपाच्या धनाची सामग्री फार चांगली आहे ४ ८८१ धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥ १ ॥ संदेहाची सुटली गांठी । जालें पोटी शीतल ॥ २ ॥ भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥ ३ ॥ तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संदेहाची-संशयाची, गाठी-प्रश्न, तारा-नाव. अर्थ :- या संताच्या पायांशी मिठी पडते, तो काळ फारच धन्य होय. १ यांच्या भेटीमुळे संशयाचे सर्व प्रश्न सुटून जातात आणि त्यामुळे मन शांत व प्रसन्न होते. २ यांच्या कृपेने भवनदीच स्वतः नाव होऊन कृपा- प्रसादाने तरून नेण्यास समर्थ बनते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता या संतापेक्षा अधिक मंगलदायक असा दाता कोण आहे ? ४ ८८२ दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥ १ ॥ संकल्पिला देहू देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ २ ॥ नाहीं अवसान घडी । सफळ जोडी इंद्रिया ॥ ३ ॥ कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- दिनरजनी-रात्रंदिवस, हेवा-हाव. अर्थ - रात्रंदिवस या गोविंदाची कीर्ती पोवाड्यातून गावी, हाच एक आमचा सततचा उद्योग आहे १ या सर्व देहाचा संकल्पही देवा, तुझ्यासाठी अर्पण व्हावा अशी आमची एकमेव इच्छा आहे. २ सर्व इंद्रियाची वृत्ती हीच असून याखेरीज दुसरो भावना क्षणभरसुद्धा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीची कीर्ती मी गर्जून सर्वत्र पसरवीत आहे व सर्व लोकांना सावध करीत आहे. ४ ८८३ सरें नानवट निक्षेपीचें जुने । काढिलें ठेवणें समयचिं ॥ १ ॥ मजुराच्या हातें मापाचा उफल । मी तो येथें फोल सत्ता त्याची ॥ २ ॥ कुलाळाच्या हाते घटाच्या उत्पति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥ ३ ॥ तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीर्णी प्रकाशाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-नानवट-नाणे, निक्षेपीचे-पुरून ठेवलेले, कुलाळाच्या-कुंभाराच्या, कीर्णी-किरणांमधून. अर्थ :- समर्थ अशा संताच्या घरी विठ्ठलकृपाचे जुनाट नाणे जमिनीत पुरून ठेविलेले होते, ते मी बाहेर सर्वांसाठी काढले आहे १ मजुराच्या हातानेच धान्याचे माप होत असले भी या ठिकाणी फुकटचा असून तरी सत्ता त्याचीच आहे. २ कुंभाराच्या हातून घटांची उत्पत्ती होते, हे खरे असले तरी, जो कोणी खरेदी करणारा असतो, तोच त्यांना स्वयंपाकाच्या ठिकाणी पाठवीत असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सूर्याचेच तेज त्याच्या किरणांतून फाकत असते, त्याप्रमाणे सर्व ध्येयातून नारायणच व्यक्त होत असतो. ४ ८८४ गंगेचिया अंताचिण काप चाड । आपुले तें कोड तुपेपाशीं ॥ १ ॥ विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ २ ॥ १ पालू. तु गाथा ५२