भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 448, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 448

४१० सार्थ तुकारामगाथा कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥ ३ ॥ बाळाचे सोईतें घांस घाली माता । अट्टाहास चिंता नाहीं तया ॥ ४ ॥ गाऊं नाचूं करूं आनंदसोहळा । भावचि आगळा' नाहीं हातां ॥ ५ ॥ तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- अंताविण-खोलो समजल्याशिवाय. अर्थ - जो तान्हेलेला आहे त्याने गंगेचे पाणी प्यावे. ह्या पाण्याच्या खोलीची चौकशी त्याने कधी करु नये. तहान भागली की नाही, हे मात्र त्याने पाहावे. १ त्याचप्रमाणे इतर कसलीही चौकशी न करिता विठ्ठलाची ही साजिरी व सुंदर अशी मूर्ती निरंतर हृदयात स्थिर करुन ठेवावी. २ सारभूत असणाऱ्या नवनीतापाशीच आपले काम असावे. इतर गबाळापाशी आपण संबंध कशास ठेवावा ? ३ बाळाची सोय व्हावी म्हणून आई त्याला एक एक घास करुन घालीत असते. त्यासंबंधी कसली चिंता किंवा कसला खटाटोप बाळाला कधी करण्याची जरूरी नसते. ४ त्याचप्रमाणे आम्ही या श्रीहरीच्या प्रेमात नाचू, गाऊ व आनंदाने सुखाचा सोहळा करु. याखेरीज दुसरा भाव आपल्या मनात कधी नसतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व एक श्रीहरिमय झाल्यामुळे आम्हास परलोकीचे भय उरलेलेच नाही. ६ ८८५ स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥ १ ॥ आतां सोडवणें धांवा नारायण । मज हे वासना अनावर ॥ २ ॥ येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुम्हीं देवा सांभाळावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पडिभर-अधिक प्रेम. अर्थ - देवा, या स्त्रीपुत्रादिक नातेवाईकांविषयी मला विशेष प्रेम वाटते व विषयसुखांवर माझे अधिक प्रेम आहे. १ नारायणा, तुम्ही धावत यावे व मला यातून सोडवावे. या वासना मला आवरेनाशा झाल्या आहेत. २ ही लोकलाज्जा आमच्या मार्गात उभी राहिलेली असल्यामुळे देवा, आमचे कार्य दूर झाले असे वाटते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस जिथे तिथे गुंतून पडण्याचेच प्रसंग दिसतात नारायणा, अशा ठिकाणी तुम्हीच मला सावरावे. ४ ८८६ पडिलों भोवनीं १ होतों बहु चिंतवनी ॥ १ होतों चुकलों मारंग । लाहो केला लाग' वेगें ॥ २ ॥ इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- भोवनीं-भोवऱ्यात, चिंतवनीं-चिंतेत, संदीं-अडचणीत. अर्थ-मी या संसारचक्राच्या भोवऱ्यात सापडलो होतो. फार मोठ्या चिंतेत होतो. १ मी मार्ग चुकून गेलो होतो. पण आता मात्र त्वरित लाभ करून घेतला आहे. २ इंद्रियवृत्तींच्या अडचणीत मी चांगलाच सापडलो होतो, चांगलाच बंदिवासात फसत होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण बरे झाले; माझ्या वाचेतून विठ्ठलाचे नाम आले ४ ८८७ बरें जालें आलौं ज्यांचीं त्यांच्या घरा । चुकला पान्हेरा³ ओढाळांचा ॥ १ ॥ बहु केलें दुखीं त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ २ ॥ १ वेगळा, २ वेग, ३ पान्हेरा