सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 460, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४२२ सार्थ तुकारामगाथा 'मज विश्वंभर बोलवितो' 'वदवी गोविंद तैंचि वदें' यासारख्या वचनाचा भावार्थ सहज, स्पष्ट व तर्कानही पटणारा असाच आहे ९२० चंदनाच्या वासे धरितील नाक । नावडे कनक न घडे हे ॥ १ ॥ साकरेची गोडी सारखी सकळा । थोरा मोठ्या बाळा धाकुटियां ॥ २ ॥ तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - कनक-सोन अर्थ - सुवासिक चंदनाच्या वासाने त्रस्त होऊन कुणी स्वतःचे नाक धरून बसतील का ? सोने कुणाला आवडणार नाही असे कधी होईल का ? १ साखरेची गोडी सर्वांना, थोरांना, लहानांना, मध्यम वयाच्या लोकांना सारखीच असते २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझे चित्त जर शुद्ध असते तर लोकांनी ही अशी निंदा कधी केली नसती ३ ९२१ तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥ १ ॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देही ॥ २ ॥ भावे हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्ताच्या परी नावडती ॥ ३ ॥ न वजासी जेथें दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियाच्या ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - परी-प्रकार न वजासी-जात नाहीस अर्थ - देवा, तुझ्यासारख्या उदार बाहयाचे नाव दुसरोकड कुठे मिळणार ? तू दातृत्वाची एक रासच आहेस तू आपले स्वतः चे स्थानही आपल्या दासाना देतोस १ मग त्या सेवकाचे अथवा भक्ताचे कुळ शुद्ध आहे, की अशुद्ध आहे उच्च आहे की नीच आहे, हेही न पाहता त्याच्या निर्मळ देहात तू निवास करीत असतोस २ त्याच्या घरचे निकृष्ट अन्नही तू मोठ्या प्रीतीने खातोस देवा, परतु जे अभक्त असतात त्यांच्या घरी असणाऱ्या नाना पक्वान्नाचे प्रकारही तुला आवडत नाहीत ३ भक्ताच्या येथून तुला दूर केले, तरी तेथून तू हालत नाहीस, जात नाहीस, पण मोठमोठ्या योग्याच्याही चित्तात तू क्षणभरही ठरत नाहीस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा हीच तुती खरी खरी ब्रीदे आहेत असे चारही वेद सांगतात ५ ९२२ तरि का नेणते होते मागें ऋषी । तोंहीं या जनासी दुराविले ॥ १ ॥ वोळगती जया अष्ट महासिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥ २ ॥ कंदमूळें पाला घातुच्या पोषणा । खातील वास राणा तरी केला ॥ ३ ॥ लावूनिया नेत्र उगेचि बैसले । न बोलत ठेले 'मौन्यमुद्रे ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - तोंहीं-त्या ऋषींनाही, वोळगती-प्रसन्न होतात अष्ट महासिद्धी-अणिमा-शरीर सूक्ष्म होणे, महिमा-शरीर मोठ होणे, गरीर हल्के होण प्राप्ति-सब प्राण्याच्या इद्रियानी त्या त्या अधिष्ठात्री देवताना रूपाना सरध यण प्राकाम्य-ऐहिक व पारलौकिक स्थानी भोग व दानाचे सामध्य येण ईशिता-ईश्वराच्या ठिकाणची मायचा प्रेरणा वगिता-आसक्त न हाण आणि प्राकाम्य-इच्छितर गुण अमर्यादपण प्राप्त होण या आठ महासिद्धी म्हणून मागितल्या आहत राणा-रानाबनात अर्थ - जे या सर्वसामान्य लोकांपासून दूर राहिले, ते पूर्वचि ऋषीमुनी काय अज्ञानी होते की काय ? त्यांनी या सामान्य जनांना का दूर केले ? १ ज्यांना अष्टमहासिद्धी प्रसन्न आहेत, त्यांनी सुद्धा या सामान्य लोकांच्या १ मौनरूप