भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 459, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 459

सार्थ तुकारामगाथा ४२१ ९१९ संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्या गव्हाणें जाणावे हे ॥ १ ॥ विठ्ठलाचे नाम घेतां नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ २ ॥ करितों कवतुक बोबडा उत्तरीं । झणी मजवरि कोप धरा ॥ ३ ॥ काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नयें ॥ ४ ॥ तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - गव्हारे = गवार माणसाने, अडाणी माणसाने, झणी = नको अर्थ :- मी माझ्या कवितांमधून जे काही बोलतो, ते खरे म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या संतांचीच उच्छिष्ट अशी वचने असतात मी अडाणी माणसाने याशिवाय काय बोलावे ? १ मला एका विठ्ठलाचे नामही शुद्धत्वाने नीट घेता येत नाही अशा स्थितीत मला आत्मबोधाचे ज्ञान कसे होणार ? २ मी काही कौतुकाने कवित्व करून बोबडे बोल बोलतो, यासाठी मजवर तुम्ही कोणी राग करू नका. ३ माझी जाती कोणती ? माझा अधिकार कोणता ? यासंबंधी तुम्ही कसलाही विचार नका करू. आणि याविषयीही मी फार बोलू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु हा देवच मला बोलवितो. त्यात काही गुह्य अर्थ असला किंवा काही भावरहस्य असले, तर तो एक परमेश्वरच जाणणारा आहे. ५ विवरण - या एका महत्त्वाच्या व प्रसादपूर्ण अभंगात आपल्या कवित्त्वविषयी व अनुभूतीविषयी तुकोबांनी दानतीन तत्त्वे फार स्पष्टपणे व मार्मिक रीतीने सांगितली आहेत प्रथमच त्यांनी नेहमीप्रमाणे कबूल केले आहे की, मी तसा अडाणीच मनुष्य असून मागील, जे कोणी मोठे सत्पुरुष होऊन गेले त्यांचेच उष्टे बोल मी बोलत आहे मागे जे श्रेष्ठ ऋषीमुनी बोलून होते, त्याचाच भाव आपण कवितेत सांगून 'झाडू संतांचे मारग । आंदरांनी भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू' अशा ओळींतून त्यांनी आपल्या कवित्वाच्या व भक्तिप्रसाराच्या कार्याचे पूर्वपरंपरामूल थोडक्यात येथेही स्पष्ट केले आहे दुसरा एक मुद्दा येथे उपस्थित झालेला आहे तो असा की, तुकोबा उच्च वर्णीयांच्या जातीचे नसल्यामुळे त्यांना कवित्त परावाक्यनिरुपणाचा अधिकार आहे की नाही ? त्यांनी वेदाचा अर्थ सांगावा की नाही ? अशा प्रका- रचे प्रश्न व त्याची चर्चा बुवांच्या वेळी होत होती या प्रकरणात त्यांच्यावर कित्येक कठिण असे अपमानाचे प्रसंगही गुदरले होतेच ते लक्षात ठेवूनच सांगतात का, मी हे सारे कौतुकाने कवित्व करीत आहे माझ्यावर कोणी रागही धरू नये माझी जात कोणती, हेही कोणी विचारू नये, असे त्यांनी विनविले आहे खरे म्हणजे विष्णुदासाना कसली आली ही जात ? असाच सिद्धान्त त्यांनी इतरत्र सांगितलेला आहे, आणि हा निर्णयही वेदशास्त्रास धरूनच असल्याची खात्री त्यांना होती 'यातायाती धर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं' उगाच आपला वर्णाचा अभिमान धरून कोण शहाणे झाले आहेत ? कोण पवित्र झाले आहेत ? उलट 'अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । संताचीं पुरानें भाट झालीं' एवढेच सांगून बुवा थांबत नाहीत, तर कबीर, लतिफ, सेना, कान्होपात्रा, दादू, चोखा, जनी इत्यादी तथाकथित यातिहीनांची उदाहरणे देऊन तुकारामबुवा विष्णुदासाना, विठ्ठलभक्ताना जातिधर्म उरत नाही, असच सांगतात "तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ' तिसरा एक महत्त्वाचा विचार या अभंगातील असा की, आपण जरी यातीहीन आहोत तरी आपल्या मुखा- तून जी अभंगवाणी स्रवते ती नुसती प्रसादिक आहे असे नव्हे, तर प्रत्यक्ष देवाचीच आहे असा बुवांचा विश्वास होता आपणास देव बोलवितो हे त्यांनी कित्येक ठिकाणी स्पष्ट केले आहे तुकोबाना देव बोलवितो याचा अर्थ असा की, अनुभवाने तुकोबा स्वत च देवत्व या पदवीस पोचलेले होते सर्वत्रहि देवच पसरून राहिलेला असल्याची अनुभूती त्यांना होती 'भावारूढ तुका झाला एका एकीं । देवच लौकिकीं अवघा केला' एका भक्तिभावामुळे सर्व विश्वच देवमय झाल्यामुळे तुकोबा बोलतील ते देव बोलला असे मानण्यात गैर काय आहे ? आणि याच भूमिकेवरून तुका- रामबुवा नेहमी म्हणत असत, 'तुका म्हणे मज बोलवितो देव', 'म्हणती माझे बोल बोले पांडुरंग,' 'पांडुरंगे भार घेतला माझा, ' 'भावाइढ तुका मुद्रा विठोबाची, ' 'बोलवितो देव मज', 'परि त्या विश्वभरें बोलविले',

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 459, कुल 611 में से · BharatKosha