सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 464, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४२६ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- मी नीट विचार करून पाहिले, तेव्हा देवा, तुम्ही मला भवसिंधू तरून नेण्याइतके समर्थ असे ताह आहात हे समजले. १ देवा, तुमचेच पाय मी माझ्या चित्तात धारण करीन गुप्त काय ते तेथेच आहे. २ माझ्या मनाच्या असलेल्या परमार्थाच्या सर्व खुणा या हरीच्या भक्तिरसात बुडून गेल्या आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातात हे मर्म आले; हे फार चांगले झाले आहे ४ ९३४ पाहाता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥ १ ॥ जिव्हे गोडी तीन अक्षराचा रस । अमृत जयास फिके पुढें ॥ २ ॥ श्रवणींची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद धारोनियां¹ ॥ ३ ॥ महामळें मन होतें जें गांबले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥ ४ ॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सापडलें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - न वजे-जात नाही, गांबले-भरलेले अर्थ - या श्रीहरीचे मुख पाहताच माझे सुख सुखावले गेले व माझ्या डोळ्याची भूक ही कधी जात नाही असे झाले. १ विठ्ठल या तीन अक्षराच्या भक्तिरसात गोडी निर्माण झाली असून तिच्यापुढे प्रत्यक्ष अमृतही फिके पडत आहे २ या श्रीहरीचे गुणगान ऐकण्याची वाटही चांगली शुद्धपणे चोखाळलेली असून सर्व भेदाभेद संपून गेले आहेत. ३ माझे मन मोठ्या मळामुळे भरलेले होते, ते यामुळे शुद्ध होऊन स्फटिकाप्रमाणे निर्मळ झाले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल म्हणजे माझ्या जीवनाचे जीवन असून एका फार मोठ्या मोलाचा साठा मला सापडला आहे ५ ९३५ हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देता ठायी द्वैत तुटे ॥ १ ॥ बोलापासि मात मन निवे हर्षे चित्त । दुणी बाढे प्रीत प्रेमसुख² ॥ २ ॥ जनात भूषण वैकुंठी सरता । फावले स्वहिता सर्वभावें ॥ ३ ॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पाहयला ॥ ४ ॥ तुका म्हणे हा विठ्ठलचि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - आळंगीन-आलिंगीन, बाहीं-बाहूंनी. अर्थ :- या परमानंदस्वरूपाच्या श्रीहरीस मी दोन्ही बाहूंनी आलिंगन देईन. त्याला आलिंगन दिल्या- बरोबर द्वैताचा नाश होतो १ त्याच्याविषयी गोष्टी करण्यातच विशेष आनंद चित्ताला होतो, मन निवून जाते व प्रेमसुखात दुप्पटीने वाढ होते २ लोकात भूषण वाढून शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते सर्व प्रकारचे स्वहित साधले जाते ३ सर्व प्रकारचा लौकिक व्यवहार संपतो, मायिक लोकाचार संपून जातो, आणि संसाराविषयीची भावना समूळ नष्ट होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला याच विठ्ठलाची रात्रंदिवस सोबत हवी; माझ्या जीवास आणखी दुसरी कसलीही हौस नाही ५ ९३६ आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥ १ ॥ प्रेमपान्हा स्तनां सदा सर्वकाळ । दृष्टि हे निमंळ अमृताची ॥ २ ॥ भूक तान दुःख वाटो नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनिया ॥ ३ ॥ आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हा करीं खेळावया ॥ ४ ॥ तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेयें न पवे हात कळिकाळाचा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - दवडी-नाहीसा कर, ठाव-स्थान, सांगात-सोबत. १ निवारुनि, २ प्रेमसुखें