सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 465, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४२७ अर्थ - देवा, तू आमची कृपाळ अशी माउली आहेस आमची सावलीच असणाऱ्या विठ्ठला, मी तुला शरण आलेलो आहे १ देवा, तुझ्या स्तनात माझ्यासाठी सदासर्वकाळ प्रेमपान्हा तयार असावा तुझी दृष्टी अमृताची व निर्मळ अशी मजवर असावी २ देवा, मला भूक, तहान, दुःख, त्रास याचे कष्ट होऊ नयेत तू माझ्या अंतःकरणाचे गुण जाणून आहेस ३ आशा, चिंता, तृष्णा, माया याना तू दूर घालविले असून, आम्हास तुझ्या स्वरूपात खेळण्या- साठी स्थान निर्माण केले आहेस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू आम्हाता संताची संगत दे तो अशी दे की, ज्या ठिकाणी कळीकाळा यमाचाही हात पोचू शकणार नाही ५ ९३७ जेथें जावे तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेपें सतसंगें ॥ १ ॥ पूर्व पुण्यें बरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ २ ॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतापायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतापाशीं द्यावा जीव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कपाळ-नशीब, सरिस-बरोबर अर्थ - ज्या ज्या ठिकाणी जावे, त्या त्या ठिकाणी आपले नशीब आपल्याबरोबर येत असते संताच्या संगतीने आपल्याला विशेष लाभ होत असतो १ आपल्याला आपली पूर्वपुण्ये जर अनुकूल झाली तर मग या विठ्ठलाशी किंवा संताशी वियोग होणारे मूळच उत्पन्न होणार नाही. २ संपत्ती, मुलगा, पत्नी हे खरे म्हणजे आपले भाग्य नव्हे या संताच्या चरणापाशी असलेला निवास चांगला असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, संताचे पाय हेच आमच्या मिराशीचे ठाणे व्हावे व आमच्या जीवाचा बळी याच संतांच्या पायावर जावा असे वाटते. ४ ९३८ आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हेचि दृढ ॥ १ ॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ २ ॥ जोडीन ते आता देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणे इहलोका आलो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तुटे-संपेल, दुस्तर-सांपडण्यास कठिन असा अर्थ :- आता मी या आयुष्यात इतर काही सोस करणार नाही या विठ्ठलाचे पाय दृढ भावाने चित्तात धरून ठेवीन १ यामुळे भवसिंधू उतरून जाण्यास मदत होईल संपण्यास कठिन असा गर्भवासही संपेल २ या आयुष्यात मी आता देवाचे चरण जोडीन, हेच माझे परमार्थविषयक असे अविनाशी धन आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले, हा मनुष्यदेह मला मिळाला आणि याच देहाने मी या लोकी जन्मास आलो ४ ९३९ जतन करीन जीवें । शुद्धभावे करुनी ॥ १ ॥ विठ्ठल विठ्ठल हे धन । जीवन अंतकाळींचे ॥ २ ॥ वदळ हे सचित सारू । बरवा करू उदिम हा ॥ ३ ॥ तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं साठवू ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वदळ-वरवरचे अर्थ - या विठ्ठलाचा ठेवा मी आता जीयाभावाने जपून ठेवीन शुद्ध भावाने मी त्याचे रक्षण करीन १ अंतकाळच्या जीवनाचे मुख्य धन, हे विठ्ठलस्वरूपाचेच आहे २ वरवरचे संचितकर्म जे आहे ते दूर सारून या विठ्ठलाच्या प्राप्तीचा व्यवहार धन्यापैकी करू ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलास हृदयाच्या पेटीत, या संपुटात साठवून ठेवू ४ १ पुढें