सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 466, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४२८ सार्थ तुकारामगाथा ९४० एवढा प्रभु भावे । तेणे सपुटीं राहावे ॥ १ ॥ होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ २ ॥ एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥ ३ ॥ आला नावा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सपुटीं-भक्ताच्या हृदयरूपी संपुष्टात, संपुटात अर्थ - हा प्रभू खरे पाहता केवढा मोठा, पण नवल असे की, तो भक्ताच्या प्रेमासाठी तो त्याच्या हृदयसंपुटात वास करतो १ याची जशी भक्ती करावी तसा तो प्रसन्न होतो जी इच्छा मनात धरावी ती तो पुरवितो २ एवढा मोठा हा सर्व जगास दान देणारा ईश्वर, पण भक्ताजवळ केवळ एखादे तुळशीचे पान मागतो पाण्याचा थेंब मागतो, व तेवढ्याने तो संतुष्ट होतो ३ हा ईश्वर आपल्या भक्तासाठी खरे म्हणजे नावारूपास, आला व तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व लोकांना अतिशय सुलभ असाही झाला ४ ९४१ भाग्यें ऐसी जाली जोडी । आता घडी विसंबेना ॥ १ ॥ विटेवरी समचरण । संतीं खूण सांगितली ॥ २ ॥ अवघें आता काम सारू । हाचि करू कंव्वाड ॥ ३ ॥ तुका म्हणे खंडू खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विसभेना-गोडणार नाही कँवाड-निश्चयाने अर्थ - माझे फार मोठे भाग्य, म्हणून या विठ्ठलाची प्राप्ती मला झाली आता याला मी एक क्षणभरही सोडणार नाही १ संतानी खूण सांगितल्याप्रमाणे विटेवर समचरण असलेल्या या देवाचा लाभ मला झाला २ आता बाकीची सर्व कामे दूर सारून याची जपणूक निश्चयाने करू ३ तुकाराम महाराज म्हणतात, पापपुण्यामुळे होणाऱ्या या पुढरुपा जन्ममरणाच्या खपा खंडित करू ४ ९४२ पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥ १ ॥ सर्वभावे लोभ्या आवडे हे धन । आम्हा नारायण तैशापरी ॥ २ ॥ तुका म्हणे एकविध जाले मन । विठ्ठला वाचून नेणे दुजें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रमाण-पूज्य अर्थ - पतिव्रता स्त्रीस जसा तिचा पती नेहमी पूज्य असतो, त्याप्रमाणे हा नारायण आम्हास अत्यंत प्रिय आहे १ सर्वांवा लोभ असणाऱ्या माणसास ज्याप्रमाणे धन अतिशय प्रिय असते, त्याप्रमाणे या नारायणाविषयी आमच्या मनात प्रीती आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, या पाडुरंगचरणी आमचे मन एकरूप झाले असून या विठ्ठलाशिवाय दुसरे मी काहीही जाणीत नाही ३ ९४३ विठ्ठल गीत गांवा विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥ १ ॥ अनाथाचा वधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भयबंधु यमपाश ॥ २ ॥ तोचि शरणागता हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या सतासमागमें ॥ ३ ॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठलनामें ॥ ४ ॥ विठ्ठलाचे नाम घेता जाले सुख । गोडावले मुख तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - गोडावले-गोड वाट अर्थ - या विठ्ठलाचेच नाम गीतामध्ये गावे, याच विठ्ठलाचे ध्यान चित्तामध्ये धरावे विटेवर उभा असणारा हा विठ्ठल डोळे भरून पाहावा १ हा विठ्ठल अनाथांचा बंधू असून कृपेचा सागर आहे हाच आपल्या