सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 471, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४३३ ९५५ निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकी भिन्न भेद घडे ॥ १ ॥ तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तेंचि वरी जेथें तेथें ॥ २ ॥ आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही. अर्थ :- या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्याने परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनानी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या- प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४ ९५६ तुजच पासाव जालोंसों निर्माण । असावे तें भिन्न कासयानें ॥ १ ॥ पाहाया जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पासाव-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे फक्त अकर्ता बनलो आहे ४ विवरण -एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व चराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुख्यपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते, पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी त्यालाच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व सृष्टीचा चराचर संसार आवागम आला एकाच अव्यक्तापासून हे सर्व गुणरूपीधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे " अव्यक्त प्रकृती हे याचे बीज, बुद्धी हे झाड, अहंकार हा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोध्या, पचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलांनी व शुभाशुभ फळांनी नेहमी समृद्ध असता सर्व प्राणिमात्रांना आधारभूत होतो " असे याचे वर्णन आढळते ज्ञानेश्वरी ग्रंथापासून या प्रतिमेचे वर्णन करताना या मूलभूत बीजा- तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतास वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे व गीता यांतील अश्वत्थ वृक्ष होय. परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव याचे हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतानी मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा कित्येक वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहोत, पापी आहोत, संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहोत व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा साऱ्या ध्यास सर्वांना असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन, मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवते ? हे पाप आले कोठून ? दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही गाबडे घातलेले दिसते संत गोरोबांनी विठ्ठलाचे अभंग लिहिले आहेत, त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर देवा, तुम्हीही प्रकृती रूपासावयाच हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत योगिनील सर्व तु. गाथा. ५५