सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 476, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४३४ सार्थ तुकारामगाथा गुणदोष वृक्षाच्या फुलाफळात येतात ना ? मग याचा दाप कुणाकडे ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा निष्कर्ष असा की, आम्ही सर्व दवा, तुझ्यापासून निर्माण झालो असल्यामुळे तुमच्या-आमच्यात भिन्नता नसावी तुकावाची शिष्या बहिणाबाई हिने तर एका अभंगात या भूमिकेवरून विठ्ठलास विचारिले आह,' तुम्ही आम्ही सुखें होतो एके ठायीं । कोणते अन्यायीं सांपडलों ॥ तुझ्याचि हिताने वाढला संसार । आम्ही का रे दूर अन्तरलों ?" तुझ्याच इच्छेन हा संसार वाढला, मग तू स्वतंत्र, शुद्ध, मुक्त व मी मात्र बद्ध, पतित कसा ? असा हा प्रश्न आहे सर्व चराचर जगत व अव्यक्त ब्रह्मतत्त्व यांच्या या विशेष नात्यावर आधारला हा भक्तीचा विकास मराठी संतानी अतिशय गोड व लडिवाळ स्वरूपात रंगविला आह या त्याच्या मुत्सद्देपणास तत्त्वज्ञानाचे पाठबळ आहेच ' मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि ' मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सब जग विस्तारलेले आहे व माझ्या ठिकाणी ही सर्व भूते आहेत अशा अर्थाच्या गीतेतील श्लोकावर भाष्य करिताना ज्ञानेश्वरानी अतिशय वहार करून आत्मा व परमात्मा, जीव व शिव, ईश्वर व भक्त याचा एकत्वाचा संबंध वणन केलेला आहे त्यांनी अनेक सरस व समर्पक दृष्टान्त देऊन म्हटले आहे की, माझेया विस्तारलेपणा भावे । हे जगचि नोहे आघवे ? । जैसे दूध मुराले स्वभावे । तरि तेंचि दहीं ॥ का योजचि जाहले तरू । अथवा भांगराचि अलंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । ते हे जग ॥ ' ९५७ प्रीतिभंग माझा केला पाडुरंगा। भवितरस सांगा का जो तुम्हीं ॥ १ ॥ म्हणऊनि काही न ठेवींचि उरो । आलो वर्मावरी एकाएकीं ॥ २ ॥ न देखोचि काहीं परती माघारी । उरली ते उरी नाही मुळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आला अंतरासी खड । तरि माझें तोड खचळिले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उरी-कमतरता, वर्मावरी-सूक्ष्म मुद्यावर अंतरासी-संबंधास अर्थ - पांडुरंगा या भवितरसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या प्रीतीचा भग केला आहे ना ? १ म्हणूनच मी आता कसलीच कमतरता न ठेवता, मी सूक्ष्म मुद्यावर येऊन तुमची वर्म काढणार आहे २ तुमच्यापासून काही माघारे परतून येईल, असे मी पाहणारच नाही काही कमतरताही उरू देणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या-आमच्या संबंधास असा हा खड पडला तर माझे तोंड मात्र लबळून जाईल ४ ९५८ लटिका ऐसा म्हणता देव । संदेहसा वाटतसे ॥ १ ॥ ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ २ ॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायी चपळत्वे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिका-खोटा मोळा-रीत भेंडोळा-गुंडाळ ताळी-ताळमेळ अर्थ - हा देव खोटाच आहे की काय, असा संशय माझ्या मनात आलेला आहे १ याची सेवा करता करता हाच अनुभव मला आलेला आहे २ तुम्ही देवा, शून्याकारी आहात, व तसेच असण्याची तुमची रीत आहे, असा तुमच्या कीर्तीचा डंका सर्वत्र गर्जत आहे तुमच्या कीर्तीचे हे भेंडोळे सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकाच ठिकाणी असूनही चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीत ताळमेळ बसत नाही ४ ९५९ जेंशासाठीं तैंसे हवे । हे बरवे कळलेसे ॥ १ ॥ उदास¹ तू नारायणा । भी ही म्हणा तुम्हीच ॥ २ ॥ ठका महाठक जोडा । जो धडपुडा लागासी ॥ ३ ॥ एकागींच भाडे तुका । नाहीं धोका जीवित्वे ॥ ४ ॥ १ उदार