सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 477, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४३५ शब्दार्थ व टीपा :- बरवें-चांगले, घडफुडा-धडधडीत, प्रत्यक्ष. अर्थ :- जो जसा असेल तसे आपण व्हावे, हे आम्हांस चांगले समजून आले आहे. १ नारायणा, तू जर उदास असशील, तर मीही तसाच उदास झालो आहे २ एका ठकास दुसरा महाठक भेटला, तसा तुमचा व आमचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी एकाकी होऊनच माझा जीव बिनधोक असल्याने या देवापाशी असा भांडत आहे. ४ ९६० बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न घराच ॥ १ ॥ आतां काशासाठीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ २ ॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चितनें ॥ ३ ॥ तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव अर्थ :- देवा, मी तुमच्यासाठी अनेक प्रकारांनी काकुळतीस आलो आहे; पण तुम्ही मात्र यासंबंधी तुमच्या चित्तात काहीही आणलेले दिसत नाही. १ मग देवा, आता कशासाठी खोटी हाव मी माझ्या मनात बाळगू ? २ देवा, तुमच्याआमच्यांत ताटातुटी झाले आहे. आता तुमच्यात व आमच्यात भेट होणार, ती केवळ तुमच्याविषयीच्या चिंतनानेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जिणे मनातील इच्छेमुळे मोठे लाजिरवाणे झाले आहे. ४ ९६१ आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥ १ ॥ मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ २ ॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मढ्यापाशी-प्रेताजवळ अर्थ :- एक आश्चर्याची गोष्ट घडलेली माझ्या मनात आलेली आहे. १ प्रेतापाशी बसून त्याच्या नाते- वाईकांनी केलेला शोक जसा व्यर्थ जातो, तशीच मी आजवर देवा, तुमचेपाशी करुणा भाकली ती फुकट गेली. २ एखाद्याचे खोटे कृत्य पाहून मग राग कसा येऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझ्या शब्दांना हा कसला शोध लावला ? ४ ९६२ मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥ १ ॥ 'लटफियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ २ ॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संकोचो-संकोच धरू अर्थ :- मला कोणतीही वस्तू मागण्याची इच्छा नसल्यामुळे मी संकोच कोणत्या गोष्टीसाठी धरावा ? १ कुठल्याही खोट्या गोष्टीची मी स्तुती करणार नाही; कारण माझ्या मनात कोणतीच इच्छा नसते. २ जे हिशेबाने येईल त्याचा स्वीकार करावा, हे तर सर्वांनाच समजते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या ठिकाणी कसली स्वामीसेवा आहे ? ४ ९६३ पाठवणें' पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥ १ ॥ घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सफळां ॥ २ ॥ १ पाटवणे.