सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 478, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४३६ सार्थ तुकारामगाथा न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥ ३ ॥ अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका १ साक्षीतें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पाठवणें-पायरीला. अर्थ :- देवाच्या देवळाच्या पायरीला नुसता स्पर्श करून, नमस्कार करून काय उपयोग ? त्याने उद्धार कसा होणार ? १ प्रत्यक्ष भेटीत जे सुख उभे राहील, तेच सर्वात चांगले शोभून दिसणारे आहे. २ जर एकमेकांची दृष्टादृष्टच झाली नाही, तर मग सर्व गोष्टी वरवरच्याच, कोरडयाच राहतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच मी अबोल झालो असून अंतःकरणात त्याच्या साक्षीने मौन धारण केले आहे. ४ ९६४ अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥ १ ॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ २ ॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥ ३ ॥ तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलेंसे प्रेम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अचळ-स्थिर, न चळणारे. अर्थ :- निर्भय असणारे असे हे एकच स्थान म्हणजे, या विठ्ठलाचे चरण होत १ म्हणूनच मी याचा विश्वास धरून याच्या पायांचा दास होऊन राहिलो आहे. २ या श्रीहरीच्या पायांची गोडी मला लागली, म्हणूनच माझी आवड पूर्ण झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कंठात या श्रीहरीचे नाम असून अंगात रोमारोमी या श्रीहरीचे प्रेम भरून राहिले आहे ४ ९६५ संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥ १ ॥ आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ २ ॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥ ३ ॥ तुका म्हणे कसां निवडा जी खरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संदेह-संशय, निरसे-दूर होईल, फिक्यासी-रुचीहीन, फिके असणाऱ्यास, फटवूं- फसवू, आळीपायीं-पायापाशी हट्ट अर्थ :- सर्व संशयाचे निरसन झाले, ते दूर झाले तरच चांगले रुचकर असते. जे फिके व रुचिहीन असते, त्याविषयी कुणासही आदर वाटत नाही कुणालाही ते आवडतही नाही. १ देवा, आता मला खोटी आशा दाखवून उगाच फसवू नका मी आता तुमच्याकडे वारंवार कुठे ये-जा करू ? २ आता तुमच्या लाभावाचून माझा जीव जरी गेला तरी काय संकट ओढवणार आहे ? मी वाचून तरी काय मोठे कार्य साधले जाणार आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पोरांनी आपल्या पायांशी हट्ट केला आहे, तो तुम्ही नीट कसास लावून पुरवावा, आमची निवड नीट करावी ४ ९६६ वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचाचि वाहो बहुतेक ॥ १ ॥ आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलागा काळ जितितसे ॥ २ ॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥ ३ ॥ तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाहो-प्रवाह, निश्चळ-स्वस्थ अर्थ :- वाणीने वृथा बडबड पुष्कळ करण्यासारखी आहे; पण त्याप्रमाणे अनुभव मात्र दुर्लभ आहे. बहुतेक ठिकाणी आधीची जी चाल असेल, तिचाच मागोवा घेत जाण्याची रीत असते. १ अशा परिस्थितीत आम्ही स्वस्थ १ एका.