सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 479, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४३७ इसे राहावे ? कारण आमच्या पाठीमागे एकसारखा काळ लागलेला आहे. तो आम्हास जिंकू पाहात आहे. २ केवळ पोट भरण्यासाठी परमार्थाचे व भक्तीचे ढोंग करून कसे चालेल ? त्यायोगे मूळ मुद्दलासच तोटा येईल ना. ३ तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुमच्या अभय अशा वरदहस्ताने मी माझ्या मनास जागृत ठेवणे हेच चांगले होय. ४ १६७ उगॅचि हे मन राहाते निश्चळ । तरि कां तळमळ साट' होती ॥ १ ॥ काय तुमचीं नेणो कवतुक विदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ २ ॥ नानाछंदें आम्हां नाचयावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साट-एकसारखी, विदाने-कौशल्ये अर्थ :- माझे मन उगेच राहून स्थिर होत असूनही मग ही तळमळ एकसारखी का होत आहे हो ? १ तुमची कौशल्ये काय व कशी आहेत, हे काही ध्यानात येत नाही तुम्ही सर्वोत्तमपणाने क्रीडा करीत असता २ देवा, तुम्ही नाना छंद करून आम्हा जीवांना नाना प्रकारांनी नाचविता, आमच्या हावा भलत्यासलत्या वाढविता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या चेष्टा करीत आहात. ४ १६८ आम्ही बळकट जालो फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥ १ ॥ जाले तेव्हां जाले मागील ते मागें । आतां धर्मलागे ठावो जालीं ॥ २ ॥ तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध युद्ध व्हावें ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- फिराउनी-फिरून, गोऊ-गुंतवू अर्थ - देवा, आम्ही फिरून आता मोठे बळकट झालो आहोत. आम्हांस सांभाळण्याचे किंवा आमच्यावर कृपा करण्याचे जे ब्रीद तुम्ही घेतले आहे, त्यात तुम्हास गुंतवून टाकू १ यापूर्वी काय झाले असेल ते असो, आता मात्र तुला पकडण्याची सर्व धर्मे आम्हास माहीत झाली आहेत २ देवा, तुझ्या सर्व चेष्टाचा सबंध तोडण्यासाठीच आम्ही शुद्ध भावाने तत्पर झालेले आहोत. तुम्हीही आमच्यासारख्या शुद्धापाशी शुद्धयुद्ध व्हावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हास आत्मस्वरूपात येण्याची जशी सोय आहे, तशीच ती तुम्हासही असेलच ४ १६९ तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसे ॥ १ ॥ कासया घातला लावणी उद्धार । ठेवा करकर बाह्यनियां ॥ २ ॥ सुटो नये ऐसे कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवूनि ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही समाग्य जी देवा । माझा तुम्हा केवा काय आला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर, नुपेक्षाल-अव्हेर करणार नाही, करकर-कटकट, बाह्यनियां-दूर करून, निरुतें-खरोखर, केवा-पर्वा, फिकीर, अवघड अर्थ:- देवा, तुम्ही माझा अव्हेर कधीही करणार नाही, अशीच खात्री मला आहे मला तुम्ही, फार अधीर आहे मी, असेच समजता. १ देवा, माझ्या उद्धाराची गोष्ट एवढ्या लावणीवर का हो टाकली आहे ? एकदा उद्धार करून ही कटकट कायमची मिटवा ना. २ खरोखर ही कटकट काही मागची सुटणार नाही, असे तुम्हांस कळते तर मग पुनः पुनः अशी आळवणी करून का घेता हो ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मोठे भाग्यवान आहात, तुम्हांला माझ्यासारख्याच्या उद्धाराचे एवढे अवघड का वाटावे ? ४ १ साठ.