सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 484, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४४२ सार्थ तुकारामगाथा फासया रूपा । नाचा आलेति गा बापा ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । न सरे हवाले घालिता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गोवा-गुतागुत, हवाले घालिता-हवाले देण्याने अर्थ - देवा, हा व्यक्त होण्याचा तुमचा तुम्ही खेळ करून गुतागुत केलीत, आणि आता चुकाचुकी करीत आहात ? अशी फसवणूक आता कशी चालेल हो ? आम्हाला जन्मास घालून असे शहाणे तरी कशास केले ? २ देवा, तुम्ही पतितपावन, भक्तवत्सल, करुणासागर इत्यादी नामारूपास तरी का हो आलात ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता नुसते हवाले देऊन भागणार नाही माझ्यावर कृपा केलीच पाहिजे ४ ९८४ माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥ १ ॥ मी का पडेन निराळा । ऐसा साडूनि सोहळा ॥ २ ॥ आता अनारिसा । येथें न व्हावे सहसा ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - एकविध-एकनिष्ठ, अनारिसा-वेगळे अर्थ - देवा, माझी ही भक्ती भोळीभावडी असली तरी, ती एकनिष्ठ व भावाने बळकट अशी आहे, १ अशा प्रकारचा भवतीचा सोहळा सोडून मी काही निराळा होणार नाही २ आता या ठिकाणी वेगळे होणे सहसा जमणारे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आपले पाय एकमेकास जुळवून आमच्यासमोर उगेच उभे राहावे, आम्हास त्याच्यावर मस्तक ठेवायचे आहे ४ ९८५ आहे तरि सत्ता । ऐशा करितो वारता ॥ १ ॥ अगसगाची उत्तरे । सलगीसेवेने लेकरे ॥ २ ॥ तरी निकटवासें । असो आशकेच्या नासें ॥ ३ ॥ तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैंची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारता-वार्ता बोलणी, अगसगाची-जिव्हाळ्याने, आशकेच्या नासे-शकाकुशका टाकून अर्थ - देवा, आमची तुमच्यावर थोडीबहुत सत्ता आहे, म्हणूनच अशी धिटाईची बोलणी मी करीत आहे १ मुलालेकराचे धनी आम्हीही असल्याने विशेष प्रकारच्या जिव्हाळ्याने व सलगीने आम्ही तुमच्याशी लडिवाळ बोलणी करीत असतो. २ तरी मनातील सर्व शंकाकुशंका काढून टाकून आम्ही नेहमी तुमच्याजवळच असू ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच सानिध्याची मला मोठी रुची आहे यात भिन्नता नाही ४ ९८६ काळ सारावा चिंतने । एकांतवासी गंगास्नाने । देवाचे पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या १ ॥ १ ॥ युक्त आहार विहार । नेम इंद्रियाचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ २ ॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया २ जतन । हे उपाय लाभाचे ॥ ३ ॥ देह समर्पिजे देवा । भार काहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चिंतनें-ईश्वराच्या नामस्मरणात, विहार-विश्रांती, वासर-स्वच्छंदी अर्थ - मनुष्याने आपले आयुष्य ईश्वराच्या नामस्मरणात घालवावे एकान्तवासात राहून गंगास्नाने पवित्र व्हावे मनोभाव देवाचे पूजन करावे तुळशीस प्रदक्षिणा घालाव्यात १ विधियुक्त व उचित असा आहार घेऊन आवश्यक तेवढीच विश्रांती घ्यावी इंद्रियसुखाना नियमितता हेच सुखी आयुष्याचे सार आहे उगाच स्वच्छंदीपणाचे वागणे नसावे, फार झोप नसावी, फार बडबड नसावी २ परमार्थविचार हेच महाधन मानून देवाचे चरण जोडावेत व एकदा जोडलेले हे चरण जपावेत कसे, यासंबंधीचे उपाय शोधणे हेच लाभाचे होण्यासारखे आहे ३ १ तुळशीची, २ करावया