सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 485, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंदेह परमेश्वरात समर्पित केलेला असावा. स्वतःच्या शिरावर मोठेपणाचे कसलाही भार घेऊ नये, यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात आनंदीआनंद निर्माण होईल ४ विवरण - तुकारामबुवांच्या अभंगात कित्येक वेळा परस्परविरोधी वचने असल्यासारखी वाटतात. संसार करावा की करू नये ? मुलामाणसांबद्दल प्रेमाने विनी असावीत ? घरदार मोडावयास हवे काय ? धनसंपत्तीचा वीट विटौ मानायचा ? यासारख्या प्रश्नाचा विचार करताना मोठीच सावधगिरी बाळगून, संदर्भ पाहून निर्णय घ्यावयास हवा. ज्यांना खरोखरीच परमार्थाचे गुह्य शोधावयाचे आहे, आत्मतत्त्वाची अनुभूती घ्यावयाची आहे, अलौकिकाचा साक्षात्कार करवून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी प्रखर वैराग्यादी साधने आवश्यक आहेत परंतु सर्व- सामान्य सांसारिक स्त्री-पुरुषांना तुकाराम महाराजांनी कोणता उपदेश केलेला आहे ? या प्रश्नाचे उत्तर या अभंगात आहे. प्रपंच व परमार्थ हे एकाच वेळी एकाच माणसास जमणार नाहीत, असही तुकोबा मधून-मधून म्हणत असले तरी सांसारिकांनी परमार्थविचार अगदीच मोडावा असे त्यांना कधीही सांगितले नाही. उलट भलत्यासलत्याच अधारी मार्गाच्या साधनांची त्यांनी अवहेलना करून नामसंकीर्तनाचे, भजनमात्राचे सर्वश्रेष्ठ साधन उपलब्ध करून दिले. जे जे फुटेर ते ते प्रभुसत्तेतूनच, अशी मनाची धारणा झाल्यावर मग संसाराचे रूपही पालटने यासाठी अगदी साधे आचार- विचार तुकाराम महाराजांनी या अभंगात स्पष्टपणे सांगितले आहेत. अखंड परमेश्वराचे अनुसंधान असावे, एकान्नवान्न सेवावा, गंगास्नान करावे, देवाचे पूजन, तुळशीला प्रद- क्षिणा, युक्त असा आहार, नियमित विश्रांती, इंद्रियसुखांची नियमित प्राप्ती, परमार्थ हेच महाधन मानावे, दयाचे धरण सोडू नये, असे अगदी साधे सोपे आचारविचार बुवांनी या अभंगात सांगितलेले आहेत. यात आचरावयास कठीण अशी साधने नाहीत, की प्रदीर्घ व्रतवैकल्यांची यातायात नाही, यात कर्मकांड नाही, की गुंतागुंतीचे विधि- निषेध नाहीत. अतिशय साध्या अशा आचरणमार्गाचा निदर्शक असा हा अभंग नित्य स्मरणीय असाच आहे.
९८७ मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे ॥ १ ॥ मेले जित असो निजोनिया १ जागे । जो जो जें जें मागे ते ते देऊ ॥ २ ॥ भले तरि देऊ गांडीची लगोटी । नाठयाळाचि गांठी देऊ माथा ॥ ३ ॥ मायबापाहूनि बहु मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥ ४ ॥ अमृत तें काय गोड आम्हापुढें । विष तें बापुडें कडू किती ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचे पुरे कोड त्याचेपरि ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - नाठयाळा-दुष्टाच्या. अर्थ - आम्ही विष्णुदास कसे आहोत ? तर प्रसंगी मेणाहूनही आम्ही मऊ आहोत, आणि प्रसंग पडला तर इंद्राच्या वज्रासही आम्ही भेदून टाकू, अशी आमची शक्ती आहे. १. आम्ही देहबुद्धीन मेलेलो असून आत्मतत्त्वाच्या जाणिवेने जिवंत आहोत. आम्ही देहबुद्धीच्या दृष्टीने झोपलेले असून आत्मतत्त्वाच्या जाणिवेने जागेच आहोत. २. जे कुणी आम्हास चांगले भेटतील, त्यांना आम्ही कमरेची लंगोटीही देऊन टाकू, पण जर कुणी नाठाळ व दुष्ट भेटतील, तर त्याच्या डोक्यात काठी आम्ही मारायला मागेपुढे पाहणार नाही. ३. आम्ही मायबापापेक्षाही पुष्कळच दयाळू व कृपावंत आहोत, पण प्रसंग पडला तर आम्ही शत्रूपेक्षाही घातपात करू शकतो. ४. आमच्यापुढे अमृताची गोडी अशी किती असणार ? आणि आम्हात्समोर विष तर बिचारे दोन होऊन उभे असते. ५. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्वच बाजूनी पूर्णपणे गोडच आहोत ज्याची जशी इच्छा असेल, तशी आमच्याकडून ती सफल होईल. ६. विवरण - तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा हा एक अभंग आहे. विष्णुदास किंवा विठ्ठलभक्त कसे असतात, याचे मोठे बोलके शब्दचित्र तुकाराबांनी यात काढले आहे. आम्ही विष्णुदास लोण्याहून मऊ आहात, कमरेची लंगोटीही कुणी मागितली तर ती देऊ मायबापाहूनही आम्ही दयावंत आहात, अमृतापक्षा आमची गाठी अधिक आहे वगैरे वर्णन संताचे, किंवा विठ्ठलभक्ताच सहज समजण्यासारखे आहे. १ निजेलिया