भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 491, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 491

सार्थ तुकारामगाथा ४४९ असतात यामुळे वियोगातही कधी त्याच्यात तुटी पडत नाही २ एकमेक एकमेकांच्या भेटीची इच्छा धरीत असतात, कुणी त्यांना थांबविले, तर ते धीर धरून पुनः पुनः त्याच्याविषयीच विचारतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे हरिभक्त माझ्या जीवाचे जीवन असून माझे केवळ प्राणसखेच आहेत ४ ९९९ नव्हे आराणूक परि मनीं वाहे। होईल त्या साहे पांडुरंग ॥ १ ॥ पंढरीसि जावे उद्वेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥२ ॥ नसो बळ देह असो पराधीन । परि हे चिंतन टाको नको ॥ ३ ॥ तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणे याजसाठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - आराणूक-शांती, सुख, उद्वेग-तळमळ अर्थ - मनात कसलेही सुख नसतानाही जो निरंतर पांडुरंगासच मनात वागवितो, त्याचेच नित्य स्मरण करितो, त्यासच तो विठ्ठल मदत करीत असतो १ पंढरपुरास जावे, पंढरपुरास जावे, अशी एकसारखी मनात तळमळ धरशील, तरच तू निःसंशय त्या ठिकाणी पावशील २ मग तुझा देह पराधीन असो, अथवा त्यात बळ नसो, पण पांडुरंगाचे चिंतन कधी सोडू नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलचिंतनात देह पडला तरी त्याची पर्वा करू नये कारण पुढे याच चिंतनासाठी देह धारण करावा लागला तरी त्याची चिंता नसावी ४ १००० कोठें देवा आले अगा थोरपण । बरें होतें १ दीन होतो तरीं ॥ १ ॥ साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ २ ॥ न पुसते कोणी कोठें ही असता । समाधान चित्ताचिया सुखें ॥ ३ ॥ तुका म्हणे जन अव्हेरिलें मज । तरी केशवराज सांभाळिता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - कोठें-कशासाठी, अव्हेरिलें-दूर लोटतात अर्थ - देवा, माझ्या अंगाला असा हा मोठेपणा व्यर्थ कशासाठी आला आहे ? मी आपला दीन वृत्तीने होतो तेच बरे नव्हते का ? १ संतांची सेवा करीत असणे हेच एक उत्तम साधन आहे मी मोठ्या प्रीतीने श्रीहरीचे नाम घेत राहीन २ मी कुठेही मनमोकळेपणाने गेलो असता कुणी विचारीत नाही, माझ्या चित्तात एक प्रकारचे समाधान पूर्णपणे भरून राहिलेले असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक मला दूर लोटतात, माझा अव्हेर करतात, अशा वेळी देवा, तूच माझा सांभाळ करितोस ४ १००१ चतुर मी झालो आपुल्या भोवता । भावैविण रिता २फुज अगो ॥ १ ॥ आता पुढें वाया जावे हे ते काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ २ ॥ गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुध्दि ॥ ३ ॥ तुका म्हणे करूं उपदेश लोका । नाहीं जालो एका परता दोषा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - फुज-अभिमान, गव, जगाचे अंतरा-लोकांच्या अंतःकरणातील अर्थ - मी माझ्या भोवतीच केवढा चतुर होऊन राहिलो आहे पाहा श्रीहरीच्या भावभक्तीशिवाय मी रिकामाच आहे उगाच पोकळ अभिमान मात्र अंगात वाढला आहे १ आता माझे आयुष्य यापुढे वाया जाईल यात नवल काय ? माझ्यात कामक्रोधांनीही वास्तव्य केलेले आहे २ लोकाच्या अंतरकरणातील गुणदोष एकत्र होऊन माझ्याही मनात ते निर्माण झाले आहेत सर्व प्राणिमात्रचा मत्सर करावा अशीच बुद्धी मजमध्ये निर्माण झाली ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांना उपदेश करतो, पण मी स्वतः मात्र एकाही दोषापासून मुक्त झालेलो नाही ४ १ होतो, २ स्फुद तु गाथा ५७