भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 490, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 490

४४८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- खडणा-भेदास अर्थ - देवा, तुझ्यामध्ये मी सर्व भावांनी मुरून जावे, विलीन व्हावे, अशी जर माझी क्षुद्र बुद्धी असेल तर तिला आग लागो. ऐक्यभावाच्या या विधीचा निषेध करण्याचीच आवड मला मोठीच आहे १ खरे म्हणजे देवा, तू आमचा स्वामी व्हावेस, मी तुझा सेवक व्हावे तुमचे स्थान उच्चावर असावे, माझे खाली असावे, असे कौतुक देवा, तू करावेस यामध्ये कधी भेदास वा तुटीस समय प्राप्त न व्हावा २ कारण, मग एकच सर्व झाल्यावर काय उपयोग ? पाणी कधी पाण्यास पीत असते काय ? वृक्षच कधी आपल्या फळाचा उपभोग घेतात काय ? या ठिकाणी भोग घेणारा निराळाच असल्याने सेवनातील गोडी कायम टिकलेली आहे ३ हिरा नेहमी त्याच्या कोंदणातच शोभून दिसतो सुवर्णाची शोभा दागिन्याच्या रूपानेच ध्यानात येते जर सर्व एकच असते, तर एकाने दुसऱ्यास कसे जाणावे ? एकाने दुसऱ्याची शोभा कशी पाहावी ? ४ उन्हात तापल्यानंतरच थंडगार सावलीचे सुख वाटते, बालकाच्यामुळेच आईला पान्हा फुटतो ना ? एक दुसऱ्यास वेगळेपणाने भेटतो म्हणूनच सुख आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे वेगळे राहण्यातच माझे मोठे हित असून मी आता मुक्त होणारच नाही, असा मला विश्वास वाटू लागला आहे ६ विवरण -या एका सुंदर अभंगात तुकारामबुवांनी आपण स्वस्वरूपात न मिळावे, मोक्षपदी न बसावे, ईश्वरस्वरूपात विलीन न व्हावे, ब्रह्मपदाची प्राप्ती न व्हावी म्हणून परमेश्वरास आग्रहाने विनविले आहे खर म्हणजे यांचसाठी सर्व खटाटोप असतो जीवदशा सपावी, देहात्मबुद्धीचा नाश व्हावा, द्वैतपणा सपावा, ईश्वर व आपण एकच अशी अनुभूती येऊन आपले सर्वस्व त्याच्याच स्वरूपात समर्पित व्हावे, यापेक्षा श्रेष्ठ अवस्था कोणती ? पण थोर भक्तास अशी विलीनस्थिती, अशी समर्पित स्थिती, अशी ब्रह्मस्थिती अथवा मुक्तीची स्थिती अडचणीची वाटते एकत्वाची अनुभूती आल्यानंतर कोण कुणाचे स्तवन करणार ? कोण कुणास डोळे भरून पाहणार ? कोण कुणापुढे लडिवाळ हट्ट करणार ? कोण कुणावर लटक्या प्रीतीने रुसणार ? दूर असलेल्या स्थितीमधील हुरहूर, मनाची तळमळ, उल्ठा यातील सुख मग कुणास मिळणार ? नामसंकीर्तन कोण कुणाचे गाणार ? आणि मग सतसगतीच काय ? या सतांच्या संगतीत असणारा आनंद आत्मस्थितीपेक्षाही, मोक्षस्थितीपेक्षाही फार मोठा असल्यामुळेच पुष्कळदा नामदेवतुकारासारखे साधुसत म्हणतात, 'झनी मुक्तिपद देशी पाडुरगा । मग या सत संगा पाहू कोठें ?' हे सुख अखंड टिकावे म्हणूनच विलीन होण्याची कल्पना संतांना सहन होत नाही प्रेमसुखासाठी आपण सेवक अथवा भक्त व ईश्वर धनी अथवा स्वामी या दोनपणाच्या भूमिकेवरच असणे यात खरी बहार आहे पुन एव उच्च स्थानी, एक खालच्या पायरीवर उभा असलेला असे असेल तरच अधिक सुख या सुखास सोडून मुक्तीची अथवा स्वस्वरूपी विलीन होण्याची आशा धरील तो करटा, असे तुकारामबुवांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे, 'सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करटा' या साधुसंतांना 'या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी' हीच इच्छा नेहमी असते 'जन्मोन्ममीं तुझा दास पुरूत्तमा । हेचि गोडी माझ्या देई जींवा' अशी मागणी या संतांची असते 'देवभक्त कोड तेथें नाहीं' अशा मुक्तीची फिकीर संत कधीच करीत नाहीत यासाठीच 'तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं येरे । तुझेचि अकिले पाडुरंगा' अशी इच्छा त्यांच्या मनात सतत असते १९८ मनीं वसे त्याचे आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥ १ ॥ जातीचे तें झुरे येर येरासाठीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ २ ॥ भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर बापुताले ॥ ३ ॥ तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - येरयेरासाठी-एक दुसऱ्यासाठी, वारता-धाडविले अर्थ - आपल्या मनात ज्याच्याविषयी प्रेम आहे त्याचे बोलणे आपणास पसंत असते त्याचाच समाचार घ्यावा असे आपणास पुन पुन वाटते १ जे एका जातीचे, एका आवडीचे असतात तेच एकमेकांसाठी झुरत