भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 489, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 489

सार्थ तुकारामगाथा ४४७ अर्थ :- आजचा दिवस केवढा धन्यतेचा आहे ! कारण आज मला संतांचे दर्शन झाले १ यांच्या दर्शनाने माझे पाप ताप नष्ट झाले माझे आजवरचे दैन्य त्वरित नाहीसे झाले २ माझ्या मनाचे पूर्ण समाधान झाले व या संताच्या पायाशी माझे मन पूर्णपणे विसावले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे साधुसंत आमच्या घरी आलेले असल्यामुळे आम्हाला दिवाळीदसर्‍याच्या सणाचाच आनंद झालेला आहे ४ ९९५ हेचि माझें धन । तुमचे वदावे चरण ॥ १ ॥ येणे भाग्यें असो जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ २ ॥ सांभाळिले देवा । मज अनाथा जी जीवा ॥ ३ ॥ जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जीत-जगण्याचे अर्थ - देवा, तुमचे चरण वदावेत हेच खरे म्हणजे माझे धन आहे १ तुमच्या पायावर चित्त समर्पून टाकावे यातच खरे म्हणजे जगण्याचे सार्थक आहे २ देवा, मजसारख्या अनाथाचा तुम्ही नीटपणे सांभाळ केलात ३ हा तुकाराम दास देवा, तुम्हास हात जोडून विनंती करीत आहे ४ ९९६ फजितखोरा मना किती तुज सांगो । नको कोणा लागो मागे मागें ॥ १ ॥ स्नेहभावें दुःख जडलेसे अंगीं । निष्ठुर हे जगीं प्रेमसुख ॥ २ ॥ निंदास्तुति कोणी करो दयामाया । न धरीं चाड या सुखदुःखे ॥ ३ ॥ योगिराज का रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं याचि गुणे ॥ ४ ॥ तुका म्हणे मना पाहें विचारून । होईं रे कठिण वज्राऐसें ॥ ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - चाड-पर्वा अर्थ - माझ्या फजितखोरा मना, तुला आता किती सांगावे ? किती शिकवावे ? तू आता कुणाच्याही मागे जाऊ नकोस कधी १ कुणाच्या विषयी प्रेम धरले की, आपल्या अंगी दुःख मात्र निर्माण होते. त्यामुळे जे निष्ठुर राहतात, त्यांनाच श्रीहरीचे प्रेमसुख प्राप्त होते २ कुणी निंदा करील, कुणी स्तुती करील, कुणी दयामाया करील, पण मी या सुखदुःखाची अथवा दयामाया करणाराची पर्वा करणार नाही कधी ३ मना, याचसाठी योगि- राज एकाच स्थानावर, एकाच आसनावर स्वस्थपणे बसून नाही का राहात ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू या सर्व गोष्टींचा विचार कर व इंद्राच्या वज्राप्रमाणे कठिण होऊन राहा ५ ९९७ जळो माझी ऐसी बुध्दी । मज घाली तुजमध्यीं । आवडे हे विधि । नियेंधींचि चांगली ॥ १ ॥ तू स्वामी मी सेवक । उच्च पद निघ एक । ऐसे करावें कौतुक । नको करु खडणा ॥ २ ॥ जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥ ३ ॥ हिरा शोभला कोदणें । अळकारी मिरवे सोनें । एक असता तेणे । काय दुजें जाणावें ॥ ४ ॥ उष्णे छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥ ५ ॥ तुका म्हणे हित । हेचि मानी माझें चित्त । नव्हे आता मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥ ६ ॥

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 489, कुल 611 में से · BharatKosha