भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 493, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 493

गुणांचा वास असावा मग त्याच्या स्थितीत कधीही पालट होणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे नाव एवढे मोठे असते की, त्याच्या नावानेही सर्वानी संतोषित व्हावे ४ १००६ शेवटोची विनवणी । सतजनों परिसावी ॥ १ ॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हासी ॥ २ ॥ पुढे फार बोलो काई । अवघे पायीं विदित ॥ ३ ॥ तुका म्हणे पडिलों पाया । करा छाया कृपेची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परिसावी-ऐकावा, विदित-माहीत अर्थ - माझी एक शेवटची विनंती आहे ती साधुसंतानी ऐकावी १ ती अशी की तुम्हास व देवास कधी माझा विसर पडू नये २ यापुढे आम्ही अधिक काय बोलावे ? तुमच्या पायाजवळ सर्व सांगितले असल्यामुळे माहीत आहेच ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडलो आहे, तुम्ही मजवर कृपेची छाया करावी ४ १००७ करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥ १ ॥ माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ २ ॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदें ॥ ३ ॥ निमित्त मापासी बैसविले आहे । मी तो काही नव्हे स्वामिसत्ता ॥ ४ ॥ तुका म्हणे आहे पाईकचि खरा । वागवितो मुद्रा नामाची हे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पाईक-प्रामाणिक सेवक शिपाई गडी अर्थ - मी तुकाराम कवित्व करीत आहे, असे जर कोणी म्हणत असले, तर खरी स्थिती अशी आहे की कवित्वाची वाणी ही काही माझ्या पदरची नाही १ कवित्वाचा हा सर्व प्रकार केवळ माझ्याच युक्तीचा नसून मला तो विश्वंभर बोलवितो त्याच्याकडून मला बोलाविले जाते २ त्याशिवाय मी पामर निरनिराळ्या शब्दांचे अर्थ- भेद जाणणार तरी कसे ? हा गोविंद जे मला वदवितो, तेच मी बोलतो ३ मी फक्त माप टाकण्याच्या निमित्तात मात्र बसलो आहे या कामी मी खरे म्हणजे कोणीच नव्हे त्या स्वामीची सर्व सत्ता आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी या देवाचा खराखुरा असा प्रामाणिक सेवक आहे त्याच्याच नामाची चिन्हे मी माझ्या अंगावर बाग- वीत आहे नामदेवाच्या मुद्रेन मी अंकित झालेलो आहे ५ विवरण - तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती कधी व कव्हां झाली यासंबंधी स्वतंत्र विवरण पुढे 'नामदेवें केलें स्वप्नामाजीं जागें (अभंग क्र १,२०) व सत्य अमृत्वाशी मन केलें ग्वाही (अभंग क्र १३३३) च्या वेळी स्वतंत्रपणे येईलच येथे फक्त एवढ्याच बाबीचाच खुलासा करावयाचा आहे पहिली गोष्ट अशी का, आपण कवित्व करिता याविषयी तुकोबांची भूमिका अत्यंत नम्रतेची पण निश्चयाची होती तुकोबासारख्या भक्तान वेदवाणीचा अर्थ मराठी भाषेत सांगण्याचा धाडा कवित्वातून कराव हे अलौकिक होतच पण याही दिव्य वाणीस प्रारंभ प्रथम विरोध झाला तुकोबा हे काही जन्मान वरिष्ट वर्णातील नसून वेदानात परमाथनान सस्कृताखेरीज इतर को भाषेत येत होत, हीही काहीजणाना पसंत नसून या सर्वोना उत्तर म्हणून या कधी वस्तुस्थित्यान निवेदन म्हणून तुकोबा आपल्या कवित्वाच वैशिष्टय मधून मधून सागाताना दिसतात त्याच्या कवित्वाचे एक वैशिष्टय या अभंगात असे आले आहे की, आपल्या कवित्वाची वाणी ही आपली स्वतःची नसून ती त्या विश्वभरान, ईश्वरान वदविली आहे आपण केवळ निमित्तमात्र आहात केवळ धान्याच्या मागाच माप टाकणारे आहात आपण फाल असून त्याचीच सत्ता खरा आहे, असा भाव इतरही सवत्र प्रकटपण दिसून येतो 'मजुराच्या हातें मापाचा उबल । मी तों येथें फोल सत्ता ह्याची' 'नव्हे अप शांहीं राहतो माझे बोल । महती माझ योजू बोले पांडुरंग', 'माझी वदवितों वाणी । ज्याणें घरिली धरणी', 'आपुलिया बळें नाहीं मी बोलत ।