भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 495, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 495

अर्थ :- कोणी तरी या देवास घ्याहो. देवास घ्याहो. आयता तुमच्या घरास चालून आला आहे हा देव. १ आणि लोक म्हणतात, देव नको, देव नको, घरी साठवण करून सर्व जागा अडून गेली आहे. आता आणखी जागा देयाला नाहींच. २ अशा प्रकारे देवाचा भाव मंदावला आहे. देवाचा भाव घसरला. आता काय करु हो? ३ मग हा देव अगदी फुकटचाच आहे. हा तरी आता घ्या ना. याला काही पैसे द्यावे लागत नाहीत. याला काही किंमत पडत नाहीं. ४ हा तुकाराम अतिशय दुबळा आहे. त्याच्या मनात पुरता भावसुद्धा नाही. पण त्याने देवास उधार घेऊनच ऋण करुन ठेविले आहे. ५ १०१० विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥ १ ॥ साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ २ ॥ भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म भजनेंचि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- येरांनीं-इतरांनी, अहंमान-अभिमान, ओस-रिकाम्या अर्थ :- सर्व जग विष्णूने भरलेले आहे, याची जाणीव फक्त विष्णुभक्तांनाच असते. इतरांनी मात्र वृथा ज्ञानाचे ओझे डोक्यावर धरावे. १ नाना प्रकारांच्या साधनाच्या संकटांचा शीण मात्र सहन करावा लागतो. तेव्हा मुख्यत अभिमान गळून जाणे हे महत्त्वाचे आहे २ पण अहंकाराचा भाव हा अतिशय कठिन आहे. एखाद्या वेळेस इंद्राच्या वज्राचा भंग करता येईल, पण मायाजाळाचा भंग करणे जमणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या देवाचे वर्म केवळ भजनामुळे हाताशी येईल. इतरांना मात्र सर्व दिशा शून्य होऊन जातील. त्याच्या हाती काहीही सापडणार नाही. ४ १०११ कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥ १ ॥ कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देईल ॥ २ ॥ वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥ ३ ॥ उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सहा-कामक्रोधादी सहा शत्रू, खळ-शत्रू, दुष्ट, जिणावें-जिंकावेत. अर्थ :- या देवास कीर्तनसुखाची गोडी स्वतः होऊन निवडायोगी वाटते; त्याला ती फार आवडते. १ या कीर्तनसुखासाठी जर कोणी अधिकारी असतील, तर त्यांस श्रीहरी हे सुख प्राप्त करून देईल. २ तीव्र वैराग्याच्या बळावर कामक्रोधादी सहा शत्रू जिंकावेत. ३ एवढे झाल्यावर मग काही करायचे साहे, असे उरणार नाही; असा बोभाटा, अशी गर्जना मी तुकाराम करीत आहे. ४ १०१२ कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥ १ ॥ अवघें आलें आंत पोटा पडलें थीतें । सारूनि निश्चित' जालों देवा ॥ २ ॥ द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मयेशा तुज ठायी ॥ ३ ॥ तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझे खतों जें गुंतलें । करूनि आपुलें घेई देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- जोडीलागीं-प्राप्तीसाठी, थीतें-पुरे, मयेशा-प्रिय स्वामी, खतों-कर्जरोख्यात अर्थ :- देवा, माझे, शरीर, माझी वाणी, माझे मन; या सर्व गोष्टी मी तुमच्यापाशी गहाण ठेविल्या आहेत. तुझ्या प्राप्तीसाठी मी कर्ज घेतले आहे. १ आता माझ्या पोटात सर्व काही सामावून पुरे झाले आहे. मी यामुळे आता अगदी निश्चित आहे. २ आता देवा, यापुढे तुला देण्यासाठी म्हणून मजजवळ अगदी तोळामासा एवढेसुद्धा १ निश्चित.