सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 498, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३५६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- मूढ--मूर्ख, मद, आगमाचे-वेदशास्त्राचे, घायें-घावाने, अर्थ :- देवा, मी अतिशय मंद बुद्धीचा असल्यामुळे, मला तुझे ते गूढ तत्त्वज्ञान काही समजत नाही. पण मी माझ्या चित्तात तुझ्याच चरणकमलांचे ध्यान करतो. १ वेदशास्त्रांतील भेद मी कसे जाणणार ? १ पण मी तुझ्याच चिंतनात काल कसा तरी संपवीत आहे. २ मी तसे काहीही जाणीत नसलो तरी, मी तुझा दास म्हणून घेत आहे. याचा अभिमान ज्याचा त्याने धरायला हवा. ३ मी संसाराची सर्व इच्छा सोडून देऊन तो मार्गही ढाणून दिला आहे. अशा प्रकाराने एका घावाने मी या जगाचा संबंध दूर केला आहे ४ मी मागच्या जन्मीच्या धर्माच्या लाभाचेही खंडण केले असून, मी माझे एकाएकी मन रक्षण केले आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, अगा, रखुमाईच्या वरा, भक्तांवर करुणा करणाऱ्या देवा, मला तुम्ही सांभाळायचे ६ १०१९ इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥ १ ॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ २ ॥ इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥ ३ ॥ इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥ ४ ॥ भलतिया मायें तारीं पंढरीनांथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - इतुले-इतकेसे तरी, भलतिया-कोणत्याही अर्थ :- देवा, माझे बोलणे नीट ऐकून एवढीशी लहान गोष्ट तरी कर ना, माझा देहाभिमान समूळ जाळून टाक ना. १ देवा, तू नीट ऐक; मी सर्वत्र समदृष्टीने तुला पाहावे अशी तरी माझ्यावर कृपा कर. २ देवा, निदान एवढे तरी कर की, संतांच्या चरणावरची धूळ माझ्या माथ्यास लागेल असे तू करावेस, अशी माझी तुला विनवणी .आहे. ३ देवा, पंढरीनाथा, नाही तर एवढेच कर की, माझ्या हृदयात रात्रंदिवस निवास कर ना. ४ पंढरीनाथा, मी आता तुला पूर्णपणे शरण आलो आहे. तू कोणत्याही का मार्गाने असो, पण माझ्यावर कृपा कर. मला तार. ५ १०२० तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥ १ ॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ २ ॥ माझे गुण दोष पाहतां न लगे' अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥ ३ ॥ नेणें तुझी कैसी करावी हे' सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥ ४ ॥ तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- लोकपाळ-राजा, प्रमुख लोक अर्थ :- देवा, मी तुझाच दास आहे, असे आता सर्व प्रमुख लोक बोलत राहिले आहेत, म्हणून तरी तू माझा सांभाळ करावांस. १ देवा, तू अनाथांच्यावर कृपा करणारा अनाथनाथ आहेस ना ? पापी लोकांचा उद्धार करणारा तू पतितपावन आहेस ना ? मग आता तुझी ही नावे तुलाच सांभाळली पाहिजेत. २ माझ्या गुणदोषांकडे देवा, पाहशील तर त्यांचा अंतच लागणार नाही. माझे चित्तच याविषयी मला ग्वाही देत आहे. ३ देवा, तुझी सेवा कशी करावी, हेही मी नीटपणे जाणीत नाही. परंतु तू माझ्या मनातील भाव जाणून आहेस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपेचा सागर असून माझे हे भवसागराचे बंधन तोडून टाक ना. ५ १०२१ जाणवें तें काय नेणावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥ १ ॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ २ ॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ ३ ॥ जायें तें फोडें न जावें तें आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥ ४ ॥ तुका म्हणे तूं करिसी तें सोपें । पुण्यें होतो पापें आमुच्या मतें ॥ ५ ॥ १ फळे, २ तें.