सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 499, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंशब्दार्थ व टीपा :- ध्यावे-वंदन करावे अर्थ - देवा, काय जाणावे, न जाणावे, ते काही समजत नसल्यामुळे तुझ्या पायावर मस्तक ठेवावे, हेच एक तात्पर्य आहे १ काय करावे, काय न करावे, या संभ्रमात तुझ्या पायाचे चिंतन करावे हे एकच सार आहे. २ काय बोलावे, काय बोलू नये, या संशयाच्या अवस्थेत देवा, तुझ्या पायावर मस्तक नमवावे, हेच एक सार वाटते. ३ कुठे जावे, कुठे जाऊ नये, या संभ्रमात, तुझे नाव आठवावे हेच चांगले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू जे जे करशील ते ते सोपेच वाटेल पुण्यमय वाटणारी पापेच आमच्या हातून होतात; पण तू आहेस म्हणून सर्व निभावते ५ १०२२ नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसे करीं ॥ १ ॥ दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन १ चरणावरी माथा ॥ २ ॥ पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निवलोण उतरीन ॥ ३ ॥ पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत गुजगोष्टी ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - आत्मस्थितिभाव-आत्मा ब्रह्मरूपच आहे अशी भावना, अभ्यंतर-अतरंग, अत करण अर्थ:-देवा, मला तुमचे ते ब्रह्मज्ञान नको आहे आत्मस्थितीची किंवा मोक्षाची अथवा मुक्तीची भावनाही मला नको. अशा प्रकारे एकच होऊन मुक्त होण्यापेक्षा देवा, मी भक्त व तू देव असेच नाते असड असावे १ गोपिकारमणा, तू तुझे सुदर सगुण असे रूप मला दाखोव मी तुझ्या चरणावर माझे मस्तक ठेवीन २ तुझे शोभिवत मुख पाहून मी तुला आलिंगन देईन, माझा जीव तुझ्यावरून उतरून टाकीन ३ काही प्रेमाने विचारशील तर तुला काही गोष्टी प्रेमातील व एकान्तामधील सांगेन काही गुजगोष्टी करीन देवा ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या गोष्टीस मात्र उशीर लावू नकोस माझे अंत करण जाणून तू माझ्यावर कृपा कर. ५ विवरण - तुकाराम महाराजाच्या या एका अभगात पुनः एकदा निर्गुणाऐवजी सगुणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे मुक्तीऐवजी, मोक्षाऐवजी 'मी भक्त तूं देव ' ही द्वैतावरची भावना या ठिकाणी स्पष्ट आहे या द्वैताच्या बुडाशी अविनाशी असे अद्वैततत्त्व असले तरी, निर्गुण निराकाराशी सुखसवाद दावय नाही, मुक्त स्थितीत प्रेमाचे हितगुज नाही, पायावर डोके ठेवणे नाही, आलिंगन नाही, जीव ओवाळून टाकणे नाही आणि भक्तीमध्ये तर याच भावनेचे सुख अवीट मानले गेले आहे ईश्वर निर्गुण, निराकार आहे व आपण त्याच्यापैकी एक किंवा दोन व्यक्त झाला ते आपण, असे नुसते ज्ञान उपयोगी पडत नाही त्याचा भोग अनुभूतीत हवा किंवा त्याची प्रतीती सवादसुखातून यावयास हवी यासाठी एकच तत्त्व दोन या अवस्थेस येते एक होते देव, दुसरे भक्त, एक होतो परमात्मा, दुसरा बनतो आत्मा पण ही भाषा अधुरी ठरते भक्तास सुदर रूपाची, देखण्या मुखसौंदर्याची, कोवळ्या चरणकमलाची, गोपिकारमणाची अपेक्षा वाटू लागते भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात भगवंताने आपले विराट रूप अर्जुनास दाखविले सर्व ब्रह्माण्डांस सामावून घेणारे ते अनंताचे रूप पाहून अर्जुन थकित झाला पण त्याचे मन भयाने व्याकुळ झाले आणि त्याने व्याकुळतेने श्रीकृष्णाय प्रार्थना केली की, 'तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास, हे जगन्निवासा, देवदेवा, प्रसन्न व्हा, आणि देवा, आपले ते पूर्वीचेच स्वरूप मला दाखवा ' अर्जुनाला श्रीकृष्णाच्या पूर्वीच्याच स्वरूपाचा लोभ जडला कारण ते सुदर होते, सगुण होते भक्ताच्या डोळ्यांना तृप्त कर- णारे होते अनेक सहस्र हात असलेल्या रूपापेक्षा चारच हात असलेले ईश्वराचे सुदर व परिचयाचे रूप अर्जुनाला पुन पुन पाहावेसे वाटते हे रूप कसे होते ? 'किरीटिन गदिन चक्रहस्तमिच्छामि त्वा द्रष्टुमह तथैव । तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, किरीट व गदा धारण करणारे, हातात चक्र घेतलेले, पूर्वीसारखेच मी तुम्हास पाहू इच्छितो म्हणून हे सहस्रबाहो, विश्वमूर्ते, त्याच चतुर्भुज रूपाने तुम्ही प्रकट व्हावे' या अर्जुनाच्या मनातील १ ठेवू दें तु गाथा. .५८