सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 503, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४६१ हीच गती होय. कुळधर्माच्या योगानेच उत्तम प्रकारची विश्रांती आपल्या मनास मिळत राहील. २ दुसऱ्यावर दया करण्याचाच आपला कुळधर्म आपण पाळावा. उपकार करणे, हाही एक कुळधर्मच आहे. सर्व साधनांचे सार म्हणजे आपल्या कुळाचा धर्म होय. ३ कुळधर्म चांगल्या रीतीने पाळल्यामुळेच मानसन्मान होतो, महत्त्व प्राप्त होते. कुळ- धर्मामुळेच आचरण पवित्र होऊन परलोकाची उत्तम गती प्राप्त होते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा जसा भाव असेल, तशा प्रकारच्या कुळधर्माची प्राप्ती आपणास आपला देव अथवा देवी करून देतील. ५ १०२७ पुण्य परउपकार पाप ते परपोडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥ १ ॥ सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हैं वर्म नाहीं दुजें ॥ २ ॥ गति तेचि मुखीं नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥ ३ ॥ संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥ ४ ॥ तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - परउपकार-दुसऱ्यावर उपकार, परपोडा-दुसऱ्यास दुख, जोडा-तुलना, अनर्गळा- स्वच्छंदी अर्थ - दुसऱ्यावर उपकार करणे हेच श्रेष्ठ प्रकारचे पुण्य होय व दुसऱ्यास त्रास देणे हे खरे पाप आहे. याशिवाय दुसरे पापपुण्य कोणतेही नाही १ सत्याने वागणे, हाच खरा धर्म असून असत्याने वागण्याने पापफर्म मात्र वाढते याखेरोज धर्माचे वर्म दुसरे नाही. २ मुखामध्ये एकसारखे प्रभूचे नाम असणे, हीच एक गती होय पण यापासून विन्मुख असणे हीच अधोगती होय. ३ साधुसंतांची संगत हा एक प्रकारचा स्वर्गवास असून सत्सगती- विषयी उदास असणे, यास स्वच्छंदी व उदासवाणा नर्क समजावा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हित आणि अहित कशात आहे, यासंबंधी स्पष्टता आहे. जे जसे उचित असेल तसे तुम्ही करा. ५ विवरण.-पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, याचा मार्मिक निवाडा तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलेला आहे दुसऱ्याचे दुख जाणून त्यावर उपकार करणे, हे पुण्य व दुसऱ्यास विनाकारण पीडा देणे, त्रास देणे, हे पाप अशी साधी, सोपी व सुटसुटीत व्याख्या तुकारामबुवांनी येथे केली आहे ती भागवतधर्माच्या परंपरेस धरून अशीच आहे जे रंजले गांजले असतील, जे पीडित आहेत, वचित आहेत, त्यांचे दुख दूर करणे, हा साधुसंतांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे जगातील पापताप दूर करावेत, खळांची बुद्धी वाईट असते ती चांगली व्हावी, सबंध विश्व धर्मप्रकाशाने धवलित व्हावे, हे खरे म्हणजे संतांचे कार्य 'तंसी बाधिलीं सोडीत । बुडालीं काढीत । साकडीं फोडित । आर्तीचिया।' आर्तांची दुःखे फेडणे व बुडणाऱ्यास वर काढणे हेच खरे म्हणजे संतांचे जोवितकार्य पाचसाठी परउपकार व परपीडा याचा उल्लेख संत करीत असतात दुसऱ्यास पीडा न देण्याचे कारण केवळ त्यांच्या पोटी कळवळा असतो, किंवा सहानुभूती असते, हेच नसून सर्वत्र पसरून राहिलेल्या आत्मतत्त्वाची जाणीव त्यांना फार मोठ्या प्रमाणावर असल्याने 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर ' असे त्यांना मनापासून वाटत असते १०२८ न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां यांयां न वजे ॥ १ ॥ न वजे यायां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ २ ॥ न वजे वांयां कांहीं केल्या तीर्थ । अथवा का व्रत वायां न वजे ॥ ३ ॥ न वज वांयां जाले संतांचे दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥ ४ ॥ तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करिता वांयां न वजे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- न वजे-जाणार नाही.