सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 502, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४६० सार्थ तुकारामगाथा पीडिलासे' (अभंग क्र ३०८७) व 'राजेंद्र पशू आर्ते मोकलीला । तो तुज स्मरला पाडुरंग (अभंग क्र २४५५) असे दोन स्वतंत्र अभंगच बुवानी गजेन्द्राच्या चरित्रकथेवर लिहिलेले आहेत १०२४ तुझा शरणागत जालो मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥ १ ॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आता साभाळी मायबापा ॥ २ ॥ अनाथाचा नाथ बोलतील सत । ऐकोनिया मात विश्वासलो ॥ ३ ॥ न करावी निरास न धरावें उदास । देईं याचकास कृपादान ॥ ४ ॥ तुका म्हणे मी तो पातकाची रासी । देईं पायापाशीं ठाव देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - अंकित-स्वाधीन, मात-गोष्ट, निरास-निराशा अर्थ - देवा, मी तुझ्या स्वाधीन झालेलो असून तुलाच शरण आलेलो आहे पांडुरंगा, माझे काही तरी हित तुम्ही करावे असे वाटते १ दया, तुझी पतिताना पावन करण्याची जी कीर्ती आहे, ती तू आता मोठेपणे सांभाळावीस २ हे सर्व संत तुला तू अनाथाचा नाथ आहेस असे बोलतात, त्याची ही गोष्ट मोठ्या विश्वासाने मी हृदयाशी धारण केली आहे ३ देवा, माझी निराशा तुम्ही कधी करू नये माझ्यासबंधी तुम्ही उदासही राहू नये या याचकास तू कृपेचे दान द्यावेस देवा ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर पातकाची रास आहे परंतु तू तुझे ब्रीद ध्यानात घेऊन मला आपल्या पायापाशी आश्रय द्यावास ५ १०२५ सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥ १ ॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसे ॥ २ ॥ घडे ज्या उपकार भूतांची ते दया । आत्मस्थिति तया अंगीं वसे ॥ ३ ॥ नो' बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनि तो जनीं जनार्दन ॥ ४ ॥ तुका म्हणे वर्म जानितल्याविण । पावे करिता सीण सांडीमाडी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - सत्यवादी-खर बोलणारा, सांडीमाडी-सोडणे, धरण अर्थ - ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे, तो नेहमीच सोवळा असतो अग्नी ज्याप्रमाणे कोणत्याही विटा- ळाने दूषित होत नाही, तसा तो असतो १ खरे बोलणारा संसार करीत असला तरी, तो पाण्यातील कमळाप्रमाणे पाण्यात राहूनही, संसारात राहूनही आसक्त असत नाही २ ज्यांना भूतमात्राची दया येते व ज्याच्या हातून त्याच्यावर उपकार होतो, त्याच्या अंगी आत्मस्थितीचा भाव निर्माण झालेला असतो असे समजावे ३ जो दुसऱ्याचे गुणदोष बोलत नाही कानानेही ऐकत नाही, तो जगात वावरत असूनही जनार्दनाप्रमाणेच असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थाचे नीट वर्म जाणून घेतले नाही तर, उगाचच काही धारण करणे, काहीचा त्याग करणे याचा शीण मात्र व्यर्थ होतो ५ १०२६ कुळधर्म ज्ञान कुळकर्म साधन । कुळधर्मे निधान हातीं चढे ॥ १ ॥ कुळधर्मे भक्ति कुळधर्मे गति । कुळधर्मे विश्रांति पाविजेल ॥ २ ॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्मे सार साधनाचे ॥ ३ ॥ कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्मे पावन परलोकींचि ॥ ४ ॥ तुका म्हणे कुळधर्म दावी देवीं देव । ययाविध भाव जरीं होय ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - निधान-ठेवा अर्थ - आपण ज्या कुळात जन्मास आलो आहोत, त्याच कुळधर्माचे ज्ञान करुन घ्यावे व ह्याचेच साधन करावे. त्यामुळेच आपल्या हातात श्रीहरीच्या कृपेचा ठेवा प्राप्त होईल १ कुळधर्माप्रमाणे वागणे हीच भक्ती व १ ना