सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 509, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४६७ नसला खटाटोप न करता अगदी सोपे असे हे नामसंकीर्तनाचे साधन या कलियुगात माणसास उपलब्ध झाले आहे 'हेंचि कलिमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचे' कारण या कीर्तनामुळे 'महाअपराधी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं यश आले' अशी साक्ष एकनाथांनी दिली आहे 'पतित पातकी पावनजगत्रीं । चतुर्भुज होती देवा ऐसे' असा निर्णय या एका अभंगात तुकारामबुवा देतात त्यास आधारही त्यांच्या व इतर संतांच्या वाङ्मयात भरपूर सापडतात 'कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥ वाल्ह्या तारिला कीर्तनीं । पावन झाला त्रिभुवनीं ॥ गणिका कीर्तनें तरली । मोक्षधामा ती नेली ॥ अजामेळ चोखा महार । कीर्तनीं तरले अपार ॥ एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक झाले पावन' असा या कीर्तनाचा महिमा स्वत एकनाथांनी वर्णन केलेला आहे या कीर्तन परंपरेविषयीच्या अधिक माहितीसाठी अभंग न ९६ वरील विवरण पाहावे
१०३७ संसारसोहळे भोगिता सकळ । भक्ता त्याचें बळ विठोबाचें ॥ १ ॥ भय चिंता¹ धाक न मानिती मनीं । भक्ता चक्रपाणि सांभाळीत ॥ २ ॥ पापपुण्य त्याचें धरू न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वमाये ॥ ३ ॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्ता² भार सर्व वाहे ॥ ४ ॥ तुका म्हणे देव भक्ता वेळांईत । भक्त ते निश्चित त्यांचियानें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - वेळांईत-साह्यकारी कैवारी
अर्थ - संसाराचे सर्व सोहळे अलिप्तपणे भोगणारे जे कुणी आहेत, अशा भक्तांना त्या विठोबाचे साह्य नेहमीच असते १ जो चक्रपाणी श्रीकृष्णच त्यांचा सांभाळ करीत असल्यामुळे त्यांना भय, चिंता धाक याची बाधा कधीही होत नसते २ सर्व भक्त एका त्या श्रीरंगाच्या नावेच रंगून गेलेले असल्यामुळे, त्यांच्या अंगास पापपुण्याचा स्पर्श कधीच होऊ शकत नाही ३ त्या भक्तांना मुक्तही व्हावेसे वाटत नाही पुन पुन जन्म घेऊन संसार करावा अशी त्यांच्या मनांत एक इच्छा असते कारण त्यांचा सर्व भार तो परमेश्वरच वहात असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात देव हा आपल्या भक्ताचा कैवारी आहे, असे त्यांना वाटत असल्यामुळे ते निश्चित असतात ५
१०३८ देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहोंचा विचार एकपणे ॥ १ ॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्याच्या सगें सुख भोगी ॥ २ ॥ देवे भक्ता रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥ ३ ॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥ ४ ॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - पार-महिमा
अर्थ - देवाने भक्ताच्यासाठी अवतार घेणे व भक्ताने त्याचे स्मरण ठेवून संसार करणे या दोन्ही बाबींचे स्वरूप एकच आहे १ देवाच्या मुळेच भक्तास सर्व सुखाचे सोहळे उपभोगता येतात व देवही त्या भक्ताच्या संगतीत सुखी होऊन जातात २ या देवानेच आपल्या भक्तांना जन्म देऊन रूप व आकार दिलेले असतात आणि भक्तांनी त्या देवाचा महिमा वर्णन केलेला असतो ३ एकाच परब्रह्माच्या अंगावर दोन भाव निर्माण झाले देव व भक्त, स्वामी व सेवक अशा दोन भावांनी ते परब्रह्म व्यक्त झाले ४ तुकाराम महाराज म्हणतात, तरी त्यांच्यात भेद कधीही नसतो भक्त हाच देव व देव हाच भक्त, इतकी एकरूपता त्यांच्यांत असते ५
विवरण - या एका तत्वस्पर्शी अभंगात तुकाराम महाराजांनी देव व भक्त याच्या अभेदत्वाचे समर्पक वर्णन केले आहे केवळ सुखासाठी भोगविलासासाठी, प्रेमाच्या सुखाने एकाच तत्त्व दोन अवस्थांना आले एक देव झाला, एक भक्त झाले आणि हे नव्य त्याच तत्त्वाच्या आवडीत चा 'आपुलीच आवडी धरुनि राहिला । आपआपणाते
१ चित्तीं, २ त्याचा