सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 520, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४७६ सार्थ तुकारामगाथा अर्थ - शिपाई किंवा सेवक होण्यात काय सुख असते, हे एक सेवकच जाणतो. म्हणून तर जीवावर उदार होऊन पाईक व्हावे. १ समोरून तोफांच्या गोळ्यांचा अथवा धनुष्यातून निघालेल्या बाणांचा वर्षाव सहन करावा, अगणित शस्त्रांचा मारा सहन करावा २ युद्ध सुरु असतांना आपल्या स्वामीपुढे होऊन हा सर्व मारा सहन करणे यातच सर्व शोभा आहे. शस्त्राचे वार अंगावर घेणे, हीच शूराची खरी भूषणे आहेत. ३ अंतर्बाह्य असे जे शूर पुरुष आहेत, धैर्यवान आहेत, त्यांनी पाईकपणाचे सुख अपार भोगले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व सिद्धांताच्या खुणा मी सांगितल्या आहेत. जो शहाणा व जाणणारा असेल, तो त्या ओळखील व त्याप्रमाणे स्वामीकार्य करून सुखी होईल. ५ १०६४ पाईक तो जाणे पाइकीचा भाव । लाग पगैं ठाव चोरवाट ॥ १ ॥ आपणां राखोनि ठकावे आणीक । घ्यावें सकळीक हरुनियां ॥ २ ॥ येऊं नेदी लाग लागों नेदी भाग । पाइक त्या जग स्वामी मानी ॥ ३ ॥ ऐसे जन केलें पाइक पाईक । जया कोणी भीक न घालिती ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाइक त्रैलोकींचा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पगें-पाय, पावले अर्थ :- जो खरा सेवक असेल तोच सेवकाचा भाव जाणेल, त्यालाच कोणत्या ठिकाणी काय आहे, चोर- वाटा कुठे आहेत, हे माहीत असल्याने तो आपली पावले नेमकी टाकीत असतो. १ तो आपले स्वतःचे रक्षण करून इतरांना फसवितो, त्यांचे सर्वस्व हरण करून घेतो. २ हे असे शूर सेवक कुणाविषयी फारसा सुगावा लागू देत नाहीत; आणि स्वतःविषयीही फारशी माहिती कुणास सांगत नाहीत असे सेवक स्वामीसहो जगासारखे मान्य होतात. ३ ज्यांना कुणी विचारोतही नव्हते, अशाही लोकांना या सेवकांनी सेवकत्वाची दीक्षा देऊन पाईक केले आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे ज्याचे सेवक आहेत, तो त्रैलोक्यात मोठा बलवान व श्रेष्ठ राजा आहे असे समजावे. ५ १०६५ पाइकांनीं पंथ चालविल्या वाट । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥ १ ॥ पारखिये ठायीं घेउनिया ठाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ २ ॥ आधारेविण जें बोलता चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥ ३ ॥ सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥ ४ ॥ तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- पारख्याचा-परक्या शत्रूचा, साटा-स्थाने. अर्थ :- या सेवकांनी शत्रूची स्थाने मोडून चांगले निर्भय असे मार्ग निर्माण केले आहेत. १ या पाईकांनी शत्रूच्या ठिकाणी हल्ला केला असून तेथेच ते बसनी करून आहेत. त्यांनी या वेळी आपल्या लोकांचे मात्र रक्षण केले आहे. २ शास्त्राचा आधार नसताना जे लोक उगाच बोलतात, ते आपल्या जातीचे नव्हेतच असे समजून येते. ३ कुणी ठरलेला, शिस्तीचा रस्ता सोडून गेले की, त्यांना हे सेवकलोक शिक्षा करतात. कारण त्यामुळे मग इतरांनाही मोठ शिक्षण मिळते ४ तुकाराम महाराज म्हणतात, हे सेवक लोक सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व प्रकारचे सुख देतात ५ १०६६ पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥ १ ॥ तो एक पाईक पाइका नाईक । भाव सकळीक स्वामिकार्यों ॥ २ ॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥ ३ ॥