सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 555, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५०९ शब्दार्थ व टीपा :-पथार्थ-खरे, अधोर-घोर नर्क, कुठोन्याचे-कोठारीचे, मालकाचे. अर्थ :-नीट खरे असेल ते यथार्थपणे न सांगता उगाच लोकांना आवडतील अशा थायफळ गोष्टी सांगतील ते महा भयानक अशा नर्कास जातील. १ एखाद्या चोराला धरल्यास तो आपल्याच मालकाचे किंवा प्रमुखाचे नाव सांगतो, मग दोघांनाही बंदिवासाची शिक्षा भोगावी लागते. २ तुकाराम महाराज म्हणतात, असा निवाडा पुराणां- नीच केलेला आहे. ही काही केवळ माझीच अशी धडपड नाही. ३ ११३८ धीर तो कारण साह्य होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहो चिंता दासांसी ॥ १ ॥ सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपणचि कळिकाळ ॥ २ ॥ जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥ ३ ॥ हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥४॥ शब्दार्थ व टीपा :-जडभारी-मोठे दुखणे, संकट, प्राकृत-साधारण, आहाच-उगाच. अर्थ :- या भक्तिमार्गात किंवा परमार्थविचारात जो धीर धरून वागतो, त्यासच नारायणाचे साह्य कार्य रूपाने होते. तो आपल्या दासांना कधीही शीण होऊ देत नाही, की दासांना चिंता करू देत नाही. १ त्याच्या भक्तांनी सुखात राहून कीर्तन करावे, मोठ्या आनंदाने परमेश्वराचे गुणगान गावे. मग तोच स्वतः आपल्या सुदर्शनाच्या साह्याने प्रत्यक्ष यमाचेही संकट दूर करितो. २ स्वतःच्या मुलावर काही मोठे संकट अथवा दुखणे जर कोसळले, तर त्यातून त्याला मुक्त करण्यासाठी त्याची आई जीव टाकते आणि हा दाता ईश्वर या सर्वसाधारण आई- सारखा नव्हे. तो आपल्या भक्ताची यापेक्षाही फार काळजी घेतो. ३ हे सर्व माझ्या अनुभवास आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व सत्यच आहे. माझे हे काही उगाच तुम्हांस सांगत आहे असे नाही. ४ ११३९ पुढें आतां कैचा जन्म । ऐसा धम वारेसा ॥ १ ॥ सर्वथाहि फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ २ ॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥ ३ ॥ तुका म्हणे चुकती १ बापा । पुन्हा खेपा सकळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वारेसा-निवारण होईल असा. अर्थ :- जन्ममृत्यूच्या खेपाचा धम निवारण होईल, असा यापुढे आपणांस कोणता जन्म येईल. १ अशी सोय या मनुष्यजन्मात प्राप्त झालेली असल्यामुळे उगाच वणवण करीत फिरू नये. २ भवसागरातून तरून नेणारी या पांडुरंगासारखी नाव भक्तिभावामुळे आपणास आता प्राप्त झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हा या देवास मनोभावे शरण गेल्याने पुन: पुनः जन्मास येण्याचे संकट मग टळेल. ४ ११४० दूध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥ १ ॥ हेंच वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ २ ॥ लोहो फफ गारा अग्नीचिया काजें । येन्हवी तें ओझें कोण वाहे ॥ ३ ॥ तुका म्हणे सोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- घृतसार-तूप हे सार, लोहो-लोखंड, फफ-कापूस. अर्थ :- गाईम्हशींचे पालन कशासाठी करायचे असते ? त्यांच्यापासून दूध, दही, ताक वगैरे पदार्थ मिळतात म्हणूनच त्यांची जोपासना आपण करतो. कारण या सर्वांत तुपासारखा पदार्थ हे सारभूत तत्त्व आहे. १ याच तुपा- प्रमाणे हे वर्म श्रीहरीचे आमच्या हाती आलेले असल्यामुळे आम्ही आमच्या चित्तात या रामप्रभूस धारण केलेला १ चुकवी.