भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 556, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 556

५१० सार्थ तुकारामगाथा आहे २ लोखंड, कापूस, गारगोटी याचे साह्य अग्नी निर्माण करण्यासाठी होत असते, म्हणूनच त्याचे ओझे वाग वायचे असते एरव्ही कोण त्याची पर्वा करतो ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, भूमिगत धन हातात येईपर्यंतच खोरी पहार वगैरे साधने जपून ठेवायची असतात ४ ११४१ वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥ १ ॥ करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ २ ॥ क्षमा दया शांति । बाण अभंग हे हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बळी । तेचि एक भूमंडळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गाढे-शूर, कळिकाळ-यम अर्थ - या विठ्ठलाचे हे सेवक मोठे शूर असून प्रत्यक्ष यमही त्यांच्या पाया पडत असतो १ ते नेहमी या विठ्ठलाचाच जयजयकार करीत असतात, दोषांचे डोंगरच्या डोंगर त्यामुळे जळून जातात २ या वीर भक्तांच्या हातात दया, क्षमा शांती हेच अभंग, न तुटणारे असे बाण असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, या जगतात हे वीर भक्तच अतिशय बलवान म्हणून प्रसिद्ध आहेत ४ ११४२ ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजीं स्मराया ॥ १ ॥ मग कैंचे रे बंधन वाचे गाता नारायण । भवसिंधु तो जाण येचि तीरीं सरेल ॥ २ ॥ दास्य करील कळिकाळ बद १ तुटेल मायाजाळ । होतील सकळ रिद्धिसिद्धी म्हणियारी ॥ ३ ॥ सफळशास्त्रांचे सार हे वेदांचे गुह्यर । पाहाता विचार हाचि करिती पुराणे ॥ ४ ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥ ५ ॥ तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे । आणीक ही दैवे सुख घेती भाविके ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - तीरीं-काठावर बद-बंधन ह्मणियारीं-म्हणण्याप्रमाणे वागणाऱ्या, गुह्यर-रहस्य, मुख्य अर्थ अर्थ - लोकहो, तुम्ही आता स्वहिताच्या खुणा कोणत्या त्या नीट ऐका केवळ पंढरीचा राणा मनामध्ये स्मरा म्हणजे झाले १ या नारायणाचे गुणगान गाताना मग कसले आले आहे बंधन ? मग याच्या गुणगानामुळे संसारसागर याच तीरावर संपला, असे समजायला हरकत नाही २ कळिकाळ हा तुमचे दास्य करील माया जाळाचे बंधन सुटेल आणि सर्व रिद्धीसिद्धी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे वागणाऱ्या होतील ३ सर्व शास्त्रांचे व वेदांचे सार ते हेच रहस्य होय हाच मुख्य अर्थ होय पुराणांचाही विचार हाच आहे ४ वर सांगितलेल्या साधनाचा अधिकार सर्वांना आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, शूद्र, चांडाळ या सर्वांना या विठ्ठलाच्या नामाचा अधिकार आहे लहान मुले पुरुष स्त्रिया इतकेच नव्हे तर, वेश्यांनाही याचा अधिकार आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात आम्हास अनुभवाने ही सर्व माहिती झालेली आहे या सुखाचा अनुभव इतर जी भाविक व सुदैवी माणस आहेत ही घेतात ६ विवरण - भक्तीच्या क्षेत्रात कुणा कुणास अधिकार आहे याचा पुन पुन उच्चार तुकारामासारख संत करीत असतात ईश्वराच्या प्राप्तीसाठी केवळ उच्चवर्णीयांनाच अधिकार असे खालच्या वर्गास किंवा हीन जातीच्या लोकांना परमेश्वराचे दार युगानुयुगं कमठ लोकांनी जणू बद केल होत स्वयप्राप्तीसाठी अथवा मोक्षसाधनेसाठी वेदादी ग्रंथातून पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनाच अधिकार प्राप्त झालेल दिसतात सर्वसामान्यांचा शूद्र वर्ग व स्त्रिया यांना हे अधिकार परंपरेप्रमाणे नाहीत बृहदारनिषद वगैरे ग्रंथातून मैत्रेयी गार्गी वगैरे स्त्रियांची नावे असल्यामुळे हे बंधन नंतरच्या काळातील असावे १ वध

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 556, कुल 611 में से · BharatKosha