भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 558, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 558

दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखो जाणे ॥ ३ ॥ न लगे मागणें सांगणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥ ४ ॥ तुका म्हणे लेईं अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूंचि होसी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- निश्चळ-स्थिर. अर्थ :- एके ठिकाणीं तू स्थिर बसून त्या श्रीहरीचे ध्यान कर. तो तुला भरपूर अन्नवस्त्र देईल. १ आम्हांस अधिक वस्तूंचा संग्रह करून काय करायचेय ? आम्हांस सर्वकाही पुरविणारा देव आमचा ऋणी झाला आहे. २ हा देव मोठा दयाळू व ममताळू असल्याने त्याला आमचा कळवळा मोठाच आहे. शरण आलेल्याचे रक्षण कसे करावे हे तो चांगले जाणतो. ३ त्या देवास काही मागावे लागत नाही, सांगावे लागत नाही. कारण तो ज्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे पूर्ण करीत असतो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू आपल्या वाणीवर या विठ्ठलाचाच अलंकार घाल. त्यामुळे या जगात तू स्वतःच विठ्ठल होऊन जाशील ५ ११४६ सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥ १ ॥ काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ २ ॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥ ३ ॥ तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कळस-भांडे, पात्र, सुरारस-दारूसारखे पेय, मृत्तिकेचा-मातीचा, सांट-साठा. अर्थ - चांगले सोन्याचे भांडे आहे; पण आत मात्र दारूसारखे पेय भरलेले आहे १ तुम्ही संतलोक मला सांगा त्या सुवर्णाच्या भांड्याच्या किंमतीचा व देखणेपणाचा काही उपयोग आहे का ? २ उलट मातीचेच वेडे- वाकडे मडके आहे परंतु आत मात्र अमृताचा साठा आहे. तोच महत्त्वाचा मानावा लागेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या दोहोंपैकी हित कशात आहे, ते मला तुम्हीच सांगा ४ शेतावर-अभंग ३. ११४७ सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥ १ ॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ २ ॥ जपतप नागरणी । न लगे आटी दुनवणी ॥ ३ ॥ कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥ ४ ॥ ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥ ५ ॥ योज न लगे सचिताचे । पीक पिकले ठायचें ॥ ६ ॥ नाही यमाचें चोरटें । विठ्ठल पागोन्याच्या नेटें ॥ ७ ॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग¹ तो पिसा ॥ ८ ॥ सराई सर्व काळ । वांयां न वने घटिकापळ ॥ ९ ॥ प्रेम पिकले अपार । नाहीं सांटवावया थार ॥ १० ॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥ ११ ॥ १ उद्योग

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 558, कुल 611 में से · BharatKosha