सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 563, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५१७ शब्दार्थ व टीपा :- डरे-भीते, पैठा-स्थिर होणे. अर्थ - हे देवा, मी केव्हा मरेन व तुमच्या चरणांशी केव्हा एकरूप होईन, इतके तुम्ही मला जीवापेक्षा प्रिय आहात १ ज्याच्या संबंधाने जग दुःखी होते, ते मला गोड आहे त्या गोडीचा इतका आदर आहे की, त्या योगे मी आनंदात स्थिरावतो. २ या योगाने आम्ही आपल्या जन्माला जाऊ व मायेचे फेरे पूर्ण झाले म्हणून असंग- पणाने राहू ३ तुकाराम महाराज म्हणतात, धन, मान व स्त्री हा सर्व पसारा मी गुंडाळून टाकिला आहे. ४ ११५८ वासो पाछै दौरे राम । सोवे खडा आपै मुकाम ॥ १ ॥ प्रेमसरडी बांधी गले । खेंच चले उधर ॥ २ ॥ आपने जनसु भुल न देवे । कर हि घर आर्घे बाट बतावे ॥ ३ ॥ तुकाप्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दौरे-पळेल, खेंच-खेचणे, ओढणे, भूल न देवे-चुकून देत नाही, वारि-ओवाळून टाकू अर्थ - राम हा दासाच्या मागे धावतो व ते आपल्या मुक्कामावर जाऊन निजले की, तेथे उभा राहतो १ भक्त प्रेमाची दोरी गळ्यात बांधून त्याला ओढीत चालवितात त्या वेळेस तो तिकडे तोंड करून चालतो २ आपल्या दासाचा तो परमार्थाचा रस्ता चुकू देत नाही असावधपणे चुकू लागले तर, हात धरून त्यांना परमार्थाची नीट वाट दाखवितो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामी प्रभो, तू दीनदयाळ आहेस; म्हणून हे गोपाळा, तुझ्यावरून मी आपल्याला ओवाळून टाकीन ४ ११५९ ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ १ ॥ इतने गोते काहे खाता । जब तूं अपना मूल न होता ॥ २ ॥ अंतरजामी जानत साचा । मनफा एक उपर बाचा ॥ ३ ॥ तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नंहि लेस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- छोर-सोड, अंतरजामीं-अंतर्यामी, लेस-लेशमात्र अर्थ :- ज्या योगाने तुझा राम येईल असे कर बाकीच्या धंद्याविषयी सर्व इच्छा टाकून दे १ जर तू आपल्या स्वरूपाला विसरला नसतास, तर अनेक जन्ममृत्यूचे फेरे का खावे असते ? २ मनात एक भाव व वाणीत दुसरा भाव, परंतु हे दोन्ही भाव अंतर्यामी असणारा जो परमात्मा तो जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात माझा प्रभू देशाविदेशातून भरला आहे त्याच्यावाचून एक लेशमात्र जागा रिकामी नाही. ४ ११६० मेरे रामको नाम जो लेवे बारोबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ १ ॥ हसत खेलत चालत बाट । खाना खाते सोते खाट ॥ २ ॥ जातनसुं मुजे कछु नंहि प्यार । असतेके नंहि हेतु धेड चंभार ॥ ३ ॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाम । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - त्याके-त्याला, पैजार-जोडा अर्थ - माझ्या रामाचे नाव जो वेळोवेळी घेईल, त्याच्या पायांत मी आपल्या शरीराचा जोडा करून घालीन १ हसताना, खेळताना, जेवताना, पलंगावर निजताना जो रामाचे नाव घेतो, २ मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा का असेना; त्याच्या जातीची, धर्माची मला प्रीती नाही. तो धेड असो अगर चांभार असो, कोणत्याही जातीचा असेना ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त माझ्या रामाच्या नामाकडे लागले आहे, त्याच्या पायाच्या ठिकाणी माझे चित्त जडो ४