भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 565, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 565

नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥ ३ ॥ और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कमली-राबळे, घोंगडी, पेनावे-पांघरून, हिरदा-हृदय, सरम-शर्म, कछु-काही अर्थ :- हरीने लाल घोंगडी मला पांघरून कसे सुशोभित केले आहे. १ मैत्रीण म्हणते, तू हरीविषयी आकांत करतेस, पण हरीचे हृदय तुजविषयी कठोर आहे २ हरीच्या ठिकाणी शरम, लज्जा काही नाही आणखीही तुला सांगते की, त्याला पुष्कळ बायका आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती मैत्रीण आणखी सांगते की, इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या हरीस नामरूप नाही. असा माझा प्रभू लोणी खात असतो. ४ ११६५ राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंव न पाई ॥ १ ॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकरामबिन सब हि फुकरी ॥ २ ॥ कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥ ३ ॥ कहे तुका सब हि चलनार । एकरामविन नहिं वासारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कवनकी-कोणाची अर्थ :- रामाचे भजन करणे, हीच जगण्याची सफलता आहे. म्हणून हरिभजनास आळस करु नकोस १ कुणाचे घर आणि कुणाची झोपडी; एका रामावाचून सर्व फुकट आहे २ कुणाचा देह व कुणाची ममता ? एका रामा वाचून सर्व नष्ट होणार आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व काही नष्ट होणार आहे. एका रामावाचून काही सार नाही ४ ११६६ काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ १ ॥ राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥ २ ॥ माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥ ३ ॥ राना रक डोगरको राई । कहे तुका करे इलाहि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- काल-यम, मिथ्या-खोटा. अर्थ :- भयंकर घातक अशा धनसपत्तीच्या ठिकाणी तू का गुंतून पडलास ? अरे, बाबा, रामनाम गा, व ऐक १ राजे आदीकरून लोक हे सर्व तू मजले आहेत असे म्हणतोस, पण जोपर्यंत काळ तुझे प्राण आकर्षण करीत नाही, तोपर्यंत हे माझे आहे, असे तुझे म्हणणे शोभते. पण प्रसंगी कोणी उपयोगी पडत नाही. २ देहादी प्रपंचही खोटा असून मनकल्पनेचा आहे, म्हणून त्याचा अभिमान टाक व देवाला भज ३ तुकाराम महाराज म्हणतात, राजाचा रंक व डोंगराची मोहरी होईल. याकरता काही तरी उपाय कर ४ ११६७ काहे रोवे आगले मरना । ग्वार तू भुला आपना ॥ १ ॥ केते मालुम नंहि पडे । नन्हे बडे गये सो ॥ २ ॥ बाप भाई लेका नंहि । पाछें तूं हि चलनार ॥ ३ ॥ काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रोवे-रडतोस, अगले-पुढचे, बाल-केस, सिपत-पांढरे अर्थ - अरे मूर्खा, पुढचा मेल्याबद्दल तू का रडतोस ? तू आपल्यावर येणाऱ्या मृत्यूस विसरलास काय ? १ किती तरी लहान मोठे मृत्यूच्या मुखी गेले, हे तुला माहीत नाही काय ? २ बाप, भाऊ आदीकरून अनेक मेले;