भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 566, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 566

त्यांची मोजदाद करीत एक दिवस तूही मरणार. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे तुझे काळे केस पांढरे झाले, हे तुला माहीत असू दे. ४ ११९८ दया मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुम्हारा ॥ १ ॥ तनजोवनकी कोन बराई । व्याधपीडादि स काटहि खाई ॥ २ ॥ कीर्त बघारूँ तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥ ३ ॥ कहे तुका नहिं समझत मात । तुम्हारे शरन हे जोडहि हात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जोवन-यौवन, बराई-मोठेपणा अर्थ :- माझ्या रामावांचून सारभूत सुख कोणते आहे ? ते मला सांगा, मग मी तुमचा दास होईन १ शरीराच्या ठिकाणी तारुण्याचा, यौवनाचा काय मोठेपणा आहे ? कारण व्याधींचे दुःख त्याला क्षीण करून मारील. २ कीर्ती वाढवावयास जावे तर आपले नाव कुठे आहे ? या खोट्याच्या फेऱ्यात पडून पश्चात्ताप का करून घ्यावा ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रकार लोकांना समजत नाही. याकरिता मी तुम्हाला हात जोडून शरण आलो आहे, याचा तुम्ही विचार करा. ४ ११९९ देखत आलौं झुटा कोरा । तो काहे छोरा घरवार ॥ १ ॥ मनसुं किया चाहिये पाज । उपर खाक पसारा ॥ २ ॥ कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥ ३ ॥ कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कोरा-निव्वळ, छोरा-सोडलास, पाज-शुद्ध अर्थ - डोळ्यांना स्पष्ट दिसत आहे की, तू निव्वळ ढोंगी आहेस, तर घरव्यवहार कशाला टाकलास ? १ प्रथम मन शुद्ध केले पाहिजे. तसे न करता वरवर राख फासणे हा सर्व पसारा आहे २ कामक्रोधादी वृत्तींना हृदयात आश्रय देणे, हाच संसार आहे. तू मस्तकावर त्याचे ओझे घेतले आहेस. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपल्या देहाचा समूळ लोभ टाकला आहे, तोच खरा संन्यासी आहे. ४ १२०० रामभजन सब सार मिठाई । हरि संताप जनमदुख राई ॥ १ ॥ दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहिं अंततारे ॥ २ ॥ खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पछतावे ॥ ३ ॥ कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खटमिठा-आंबटगोड, संताप-त्रिविध ताप अर्थ :- रामाचे भजन करणे हे सगळ्या गोडाचे सार आहे. हे जन्मदुःख व त्रिविध ताप विशेष नाहीसे करते. १ दूधभात, तूप, साखर सेवन केल्याने भूकही नाहीशी होत नाही व ते पुरतही नाही. २ खाण्यातच सर्व युग निघून जाते. नंतर आंबटगोडाच्या रुचीच्या मोहाने पश्चात्ताप होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रामरसाचे ज्याने सेवन केले, तो मोठ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात केव्हाही सापडणार नाही ४ १२०१ बारबार काहे मरत अभागी । बहुरि गरन संख्या तोरेभागी ॥ १ ॥ ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे बैकुंठ जाम ॥ २ ॥ रामनाम मोल नहिं बेचे कदरि । यो हि सब माया छुरावत झगरी ॥ ३ ॥ कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चालो ॥ ४ ॥