भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 579, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 579

सार्थ तुकारामगाथा ५३३ पण त्यांची खरी प्रीती मात्र नाना प्रकारच्या विषयांवर असते ३ त्यांच्यासारख्याच शिष्यांचा सुकाळ असतो त्यांच्याभोवती. त्यांचे देह चांगले जाडजूड असून दंडही चांगले पोसलेले असून ते सर्व चांगलेच विषयासक्त असतात. ४ दुसऱ्याने केलेली सेवा, मान, धन यांच्या इच्छेने त्यांना संपन्न झाल्यासारखे वाटते. ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सोंगाडे साधक नरकासच जाणारे आहेत. त्यांची मी चांगलीच फजिती करून सोडतो. ६ विवरण :- साक्षात्कारांनतर तुकोबांचे मन शांत झाले. ईश्वरी कृपेचे तेज त्यांच्या मुखावर विलसू लागले. त्यांच्या वाणीस एका बाजूस वात्सल्याचे, करुणेचे, तृप्तेनचे झरे फुटत राहिले, तर दुसऱ्या बाजूस त्यांच्या वाणीतून प्रखर शब्दांनी समाजसुधारणेचे कार्य परकरले. ही सुधारणा दुहेरी होती. लोकांचे संसार कसे विस्कटून गेले होते, लोक अनाचाराकडे कसे वळत होते. इंद्रिय सुमुखातच कशी गोडी त्यांना अवीट वाटत होती, केवळ प्रपंच, केवळ धन- दौलत याचीच चिंता त्यांना कशी असे, याचे वर्णन बुवांनी जितक्या प्रखर व कडक शब्दात केले आहे, तितक्याच तिखट शब्दाच्या प्रहारांनी त्यांनी समकालीन भोंदू गुरूचा, ढोंगी साधकांचा, खोट्या संतांचा निषेध केला आहे. धर्माच्या नावाखाली, देवाच्या प्राप्तीसाठी, रात्रीसाधू व ढोंगी बुवांनी समाजास लुबाडण्यास व परमार्थाच्या नावे भलत्याच मार्गास नेण्याचा प्रयत्न चालविला होता. बाह्यकर्मकांड, बाह्यवेष, नवरंग्यापारा, अगारेधुपारे, जादूटोणा, चमत्कार यांनी खरा परमार्थविचार लुब्ध होण्याच्या पंथात होता. जिकडे तिकडे ढोंगी साधू व व्यसनी साधक याचा गजबझाट झालेला होता. या विकृत अशा समाजस्थितीचे चित्रण त्यांच्या कडक निषेधासहित तुकारामबुवांनी केलेले आहे, त्यांनी म्हटलेले आहे, 'ऐंसे संत झाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी' 'एकभारती तोंडात चिरमीम धरुन व्यसनाधीन झालेल्या 'संतांना' 'आदर्श कसला आला आहे ? हे सर्व सोंग असल्यामुळे तेथे पांडुरंग कधीच असणार नाही असा त्यांचा विश्वास होता. गाजराच्या पुंगीसारखे क्षणभर टिकणारे व जागोजागी दिसणारे योगी अट्‍टवारी झाले होते. 'अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान' अशी त्यांची स्थिती असे. पर द्रव्य व परनारी याची अभिलाषा मनात धरून नाक धरणारे ढोंगी साधू सर्वत्र वावरत होते त्यांचा निषेध करताना तुकोबांनी म्हटले आहे, 'जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर' 'कुणी डोक्यावर बेस वाढ- वितात, कुणी अंगात भुते आणतात, कुणी शकुन सांगून लोकांना फसवितात, कुणी जटा वाढवून 'अभिमान मोठा करिताती' नवींगाना विभूतीलेपन असले तरी त्याचे लक्ष मात्र मिष्टान्नावर असते. तुकारामबुवांनी अशा गोसा- व्याचा, नाथाचा, महानुभवाचा निषेध केलेला आहे. 'घालीनिया फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती' अशी त्यांची अवस्था होती असे हे भोंदू साधू सर्वत्र दिसत होते. 'अंगीं लावूनिया राख । डोळे झांकुनि करिती पाप' कारण त्यांनी केवळ पोटासाठीच ही सर्व बाह्य सोंगे घेतलेली होती, मुखाने ब्रह्मज्ञान बोलणाऱ्यांचे चित्त धनावरच असते. सर्व पंथिक साधकही पिंडपोषकच म्हणजे शरीरधारणेचीच काळजी करणारे होते. गांजा ओढण्यात, भांग पिण्यात, मद्यपान करण्यातही काही भक्तिसाधनेची जोड आहे, असे प्रतिपादन करण्याचेही धैर्य काही साधुसंतांना होत असे. समाजापुढे हे असे ढोंगी साधू केव्हाही निषेधार्हच असल्याने बुवांनी कडक शब्दात त्यांनी धिंड काढली आहे. १३१५ मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥ १ ॥ कोणाचा कोणासीं न¹ धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ २ ॥ काढा जी आपुलें मोह बुंथी जाळें । नका लावूं बळें वेड आम्हां ॥ ३ ॥ जीव शिव काहीं ठेवियेलें नाहीं । सत्य तुम्हां ठायें असोनियां ॥ ४ ॥ सेवेच्या अभिलापें न घराचि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥ ५ ॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥ ६ ॥ तुका म्हणे काय छायेचा अभिलाप । हंस पावे नाश तारागणीं² ॥ ७ ॥ १ न धरणे, २ तारागणी.