भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 580, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 580

५३४ सार्थ तुकारामगाथा

शब्दार्थ व टीपा :- लटिके-खोटे, बुंथो-खोळ, वस्त्र अर्थ .- देवा, मी जर सर्वत्र पाहिले तर मला सारे खोटेच दिसते. तेव्हा हे सर्व मायाजाळ आहे तरी काय? ते मला दाखोव ना ? या जगात कुणाचा कुणाशी सबंध नसून जे आहे ते शुद्ध बुद्ध असे जागच्या जागीच स्वयंसिद्ध असे आहे. २ देवा, तुम्ही आमच्यावर घातलेले हे जे मायेचे वस्त्र आहे तो फाडा ना. आम्हांला उगाच त्यापाठी वेड लावू नका ३ देवा, खरे पाहता सर्वत्र एकच तत्त्व असताना तुम्ही एकास जीव व एकास शिव अशी नांवे ठेवलीत. ४ आमच्याकडून तुम्हास सेवा घ्यायची इच्छा असल्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचारच न करिता आम्हास जन्ममृत्यूच्या खेपात फिरवीत आहात ५ आता तरी आहे ही वस्तुस्थिती समजल्यावर देवा, जो काही खोटाच द्वैतभाव धरला आहे तो सोडून द्यावा ६ तुकाराम महाराज म्हणतात, तारागणाचा, आकाशातील तारकांचा देखावा प्रतिबिंबाच्या रूपाने पाण्यावर पडलेला पाहून त्या ठिकाणी मौक्तिकाचा मोह हंसाला उत्पन्न होतो व तेथे उडी घेतल्यामुळे बिचारा हंस मात्र नाश पावतो. ७ १२१६ पंचभूतांचा गोधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥ १ ॥ तेथें काय भी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा फेडीं रिझें । हे काळाचे भातुकें ॥ २ ॥ जीव न देखे मरण । घरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥ ३ ॥ इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- पचभूताचा गोधळ-पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूताच्या एकीकरणा- तून झालेला मानवी देह अर्थ :- पृथ्वी, आप, तेजादी पंचमहाभूतांचे एकत्रिकरण होऊन हा मानवी देह निर्माण झाला व हा देह म्हणजेच मी, असा अहंकार जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला १ या ठिकाणी शरीर म्हणजेच मी, त्याचे ओझे माझ्यावरच आहे अशा ममत्वाच्या भावनेने मनुष्य काळाचेच खाद्य असणारा देह कौतुकाने जपू लागतो. २ खरे पाहिले असता, जीवास मरण कधीही नसते. तो जुने वस्त्र टाकून देऊन नवीन स्वीकारतो. पूर्वजन्मीच्या शुभाशुभ कर्माच्या भोगानुसार हे सर्व घडते ३ मागच्या जन्मीच्या कर्मानुसार इच्छेचा वेल वाढीस लागतो या इच्छारूपी वेलाला न वाढविणे, त्याची वाढच खुंटविणे, हे सत्य होय तुकाराम महाराज म्हणतात, ज्यानी आपली इच्छाच याप्रमाणे नाहीशी केली, तोच गुह्य किंवा गुप्त असलेले हे ज्ञान प्राप्त करून घेण्यास समर्थ होईल. ४ विवरण :- शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असून त्यात अहंकार, इच्छा निर्माण होऊन त्याचे कोडकौतुक केले जाते व त्यात असणारा अविनाशी आत्मा मात्र दुर्लक्षित होतो, हा एक तात्त्विक विचार तुकाराम महाराजांनी या अभंगात मांडलेला आहे. अहंकार व इच्छा यांचा त्याग करून आत्मतत्त्वच ओळखल्यासच खरे रहस्य समजेल, असे त्यांनी या ठिकाणी सुचविले आहे. पंचमहाभूतात्मक मानवी देह, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, यांचे शब्द, स्पर्श, रूप गंधात्मक पाच विषय, संकल्पाविकल्पात्मक मन, व्यवसायात्मक बुद्धी, अहंकार, इच्छा सुखदुःखादी भावना इत्यादींचा एकत्र मेळ म्हणजेच हे शरीर असा विचार शास्त्रानीही केलेला आहे गीतेच्या तेराव्या अध्यायात या शरीराचे म्हणजे क्षेत्राचे सविस्तर वर्णन आलेले आहे. महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, दहा सूक्ष्म इंद्रिये, एक मन, पंचविषय इच्छा, द्वेष, सुख, मद्यन, चेतना, धैर्य इत्यादी तत्त्वाच्या समुदायास क्षेत्र अथवा शरीर म्हटले आहे हे क्षेत्र अथवा शरीर जो जाणतो तो क्षेत्रज्ञ होय.

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 580, कुल 611 में से · BharatKosha