सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 582, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५३६ सार्थ तुकारामगाथा जाले सुख जीवा आनंद अपार । परमात्मवे भार घेतला माझा ॥ ४ ॥ तुका म्हणे यासी नावाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी वळें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - याती-जाती, मतिहीन-बुद्धीहीन, अगीकार-स्वीकार प्रचित-अनुभव अर्थ - मी यातीहीन म्हणजे हलक्या जातीचा असून बुद्धीनेही मद आहे माझे रूपही मोठे चांगले नसून मी अतिशय दीन असा आहे आणखीही माझ्यात काही अवगुण आहेत हे मी चांगलेच जाणून आहे १ असे असूनही माझा स्वीकार त्या पांडुरंगाने केलेला आहे याची मला चांगलीच जाणीवही आहे २ हा ईश्वर ज काही करतो ते माझेंच हित आहे, हा अनुभव माझ्या चित्तास पूर्णपणे झालेला आहे ३ या माझ्या जीवाला अपार असा सुखानंद झाला असून या परमात्मस्वरूपी विठ्ठलान माझा सर्व भार आपल्या स्वतःच्या शिरावर घेतलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, या देवाला स्वतःच्या नावाचा मोठाच अभिमान असल्यामुळे शरण आलेल्या भक्तांना तो तारतो ५ १२२० बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी वेशीराजा मायबापा ॥ १ ॥ तुझ्या पायी मज जालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ॥ २ ॥ ऋषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥ ३ ॥ नाहीं नास ते सुख दिले तयास । जाले जे उदास सर्वभावे ॥ ४ ॥ तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेसी पाय तुझे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काजा-कार्यासाठी आस-इच्छा मोकलिली-मोडून दिली नास-नाश अर्थ - देवा, वेशीराजा, मायबापा, भक्ताच्या कार्यासाठी तू फारच उतावीळ झालेला दिसतोस ाहभो १ माझा सर्व विश्वास देवा तुझ्याच पायाशी असल्याने मी इतर ठिकाणची सर्व आशा आता सोडून दिलेली आहे २ ऋषी, मुनी, साधक सिद्ध याना अपार असलेल्या तुझ्या रूपाचा विचार थोडासा का होईना समजलेला आहे ३ म्हणूनच ज्याचा कधीही नाश नाही, असे सुख जे सर्वस्वावर उदास झाले त्यांनाच तू दिलेस ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सुख माझ्याही मनात मावेनासे झाले आहे मी तुझे पाय माझ्या जीवापाशी जपून धरले आहेत ५ १२२१ मायामोहजाळीं होतो सापडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥ १ ॥ काढुनि बाहेर ठेविलो निराळा । कवतुक डोळा दाखविले ॥ २ ॥ नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखें साच केलीं ॥ ३ ॥ रडे फुडे दुखें कुटितील माथा । एकासी रडता ते ही मरे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज वाटते नवल । मी माझे हे बोल ऐकोनिया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरा सत्य अर्थ - मी प्रपंचाच्या व देहादी वृत्तींच्या मायामोहाच्या जाळयात सापडलो होतो पण या पांडुरंगास माझी दया आली व मी त्यातून सुखरूपपणे बचावलो १ त्याने मला त्यातून बाहेर काढले व कृपेचे कौतुक माझ्या डोळयांना त्यानेच दाखविले २ नाही तर ही माया कशी असते ? तिच्या मोहाने सर्वजणांचे देहभान विसरते ती सर्वांना नाचायला लावते व नाशवंत असणारी ही इंद्रियसुखे खरीच आहेत, असा भास निर्माण करते ३ त्यामुळे सर्व जीवांना रडावे लागते इंद्रियसुखासाठी डोकेफोड करावी लागते आणि एकासाठी रडणारा दुसरा जीव असतो तोहो एके दिवशी मरून जातो ४ असे असताना तुकाराम महाराज म्हणतात, मी, माझे शरीर, माझा प्रपंच इत्यादी मिथ्या अभिमानाचे बोल ऐकून मला फारच नवल वाटते ५ १२२२ देहभाव आम्ही राहिलो ठेवूनि । निवात चरणीं विठोबाच्या ॥ १ ॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ २ ॥