सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 583, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५३७ म्हणउनि नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥ ३ ॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- उपाय-उपाय, अंकित-स्वाधीन. अर्थ :- आम्ही आपला सर्व देहभाव निवान्तपणे त्या विठ्ठलाच्या चरणी वाहून मी आता स्वस्थ झालेलो आहे. १ आमचे हित जेणेकरून होईल, असे सर्व काही उपाय तो करीत असतो. २ म्हणून मला आता हे मी कानांनी ऐकले असल्यामुळे कसलेच सुखदुःख वाटत नाही. ३ मी आपला सर्व भार आता देवावर घालून, निःसंग होऊन एकटाच राहिलेला आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्या विठ्ठलाचा अंकित झालो आहे, स्वाधीन बनलो आहे, तो आता माझे जे जे हित असेल ते करील. ५ १२२३ आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरि तें जतन होय देठीं ॥ १ ॥ नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवतां ॥ २ ॥ चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हानि लाभ ॥ ४ ॥ अर्थ:- ठाया-ठिकाणास, आघात-संकटे अर्थ :- झाडाला आलेले फळ पिकेपर्यंत टिकून राहील हे खरे, पण केव्हा ? ते जर देठास जपून राहिले तर. १ त्याचप्रमाणे आपण ईश्वराच्या नामाशीच एकनिष्ठ राहिलो तर आपला हेतू सिद्ध होईल, पण हे अनुसरणे दुसरे काही मनात ठेवण्याची व्यभिचाराची बुद्धी नसेल तर. २ ज्या मार्गाने ज्या ठिकाणास आपण निघालो आहोत, ते स्थान मध्येच काही संकट आड आले नाही तर आपण गाठू शकू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण मध्येच जर काही संकटे निर्माण झाली तर मात्र होणाऱ्या लाभाची हानी घडते ४ १२२४ निरोधाचें मज न साहे वचन । यहु होतें मन कासावीस ॥ १ ॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ २ ॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे' उबग आला यांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळे । आशामोहजाळें दुःख वाढे' ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निरोधाचे-निषेधाचे, विरोधाचे अर्थ :- या भक्तीच्या किंवा परमार्थाच्या निषेधाचे अथवा विरोधाचे जर एखादे वचन असेल तर ते काही मला सहन होत नाही. त्यामुळे माझे मन फारच कासावीस होते १ यासाठीच माझ्या जीवास कुणाचीही संगत आता सहन होत नाही. एकान्तात बसण्यातच मला फार गोडी वाटते. २ देहबुद्धीची भावना व निरनिराळ्या वासनांची संगत या गोष्टी काही आता मला आवडत नाहीत. त्यांचा मला भारी उबग आला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आशा व मोह यांच्या जाळ्यात मी सापडल्यामुळे दुःख मात्र वाढते व त्यामुळे देवाशी मात्र अंतर पडते. ४ १२२५ तुजशीं संबंधचि खोटा । परता परता रे³ खोंटा ॥ १ ॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ २ ॥ जेथें मुद्दल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥ ४ ॥ १ न साहे उबग, २ दाटे, ३ रे तू खोटा. तु. गाथा... ६८